For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्सवेलने जागविल्या कपिल देवच्या खेळीच्या आठवणी

06:08 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
मॅक्सवेलने जागविल्या कपिल देवच्या खेळीच्या आठवणी
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या नाबाद 201 धावांच्या खेळीने 1983 मध्ये टनब्रिज वेल्सवर कपिल देवने भारताला पराभवापासून वाचविताना केलेल्या खेळीच्या आठवणी जागृत केल्या. 40 वर्षांनंतर वानखेडेवर तशाच प्रकारच्या स्थितीतून मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.

1983 च्या विश्वचषकात भारताची झिम्बाब्वे संघाविरुद्ध 5 बाद 17 अशी स्थिती झाल्यानंतर कपिल देवने नाबाद 175 धावांची झुंजार खेळी केली होती. मंगळवारी रात्री अफगाणिस्तानच्या माऱ्याविरुद्ध 7 बाद 91 अशी स्थिती झाल्यानंतर मॅक्सवेलने जिगरबाज व तुफानी खेळी करत सर्वांना धक्का दिला. 25 जून, 1983 रोजी भारतीय संघव्यवस्थापक पी. आर. मान सिंग यांनी कृष्णम्माचारी श्रीकांतला जाग्यावरून हलू दिले नव्हते. कपिल त्यावेळी पीटर रॉसन आणि केविन करन यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत होता आणि जोवर कपिल फलंदाजी करत आहे तोपर्यंत प्रत्येकाने जिथे आहे तिथेच थांबावे, असे सांगण्यात आले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील मॅक्सवेलने मुजीब उर रहमानला षटकार खेचेपर्यंत त्यांच्या ड्रेसिंग रूममधील ठरलेल्या जागी चिकटून राहिल्याप्रमाणे राहिले.

Advertisement

मी जॉर्ज बेलीसोबत बसलो होतो आणि अॅडम झॅम्पा आंत-बाहेर करीत होता. तो कदाचित थोडा चिंताग्रस्त झाला होता. पण प्रत्येक जण आपल्या जागी चिकटल्याप्रमाणे स्थिर होता, असे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात यश मिळविल्यानंतर त्याच्ंाा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मीडियाला सांगितले.

मॅक्सवेल आयुष्यभरातील आपला एक सर्वोत्तम डाव आणि निश्चितच एकदिवसीय क्रिकेटमधील आणि विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी खेळला. ड्रेसिंग रुममध्ये बसणे इतके दबाव आणणारे असेल असे मला वाटले नव्हते. जसजसा डाव पुढे जात राहिला तसतसा दबाव वाढत गेला. मी जे मैदानावर घडले ते पाहून अगदी भारावून गेलो आणि इतरांप्रमाणेच खेळ पाहण्यात गुंग झालो. मला फलंदाजीला जायचे आहे याचा तर मी अजिबात विचार केला नाही, असे हेझलवूड पुढे म्हणाला.

मॅक्सवेलने काही दिवसांपूर्वी नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकातील सर्वांत वेगवान शतक नोंदविले होते. असे असले, तरी मॅक्सवेलची 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश असलेली 128 चेंडूंत नाबाद 201 धावांची खेळी ही त्याची अग्रक्रमांकाची खेळी आहे, असे हेझलवूडने सांगितले. आम्ही 40 चेंडूंत त्याचे शतक पाहिलेले असले, तरी मला कोणाचीही अशी एकदिवसीय सामन्यातील खेळी आठवत नाही, जी या द्विशतकी खेळीशी बरोबरी करू शकेल, असेही मत त्याने व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.