For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News : मसूर पोलिस स्टेशनचे बांधकाम प्रस्ताव फाईलमध्येच; नागरिकांमध्ये नाराजी

05:58 PM Dec 04, 2025 IST | NEETA POTDAR
karad news   मसूर पोलिस स्टेशनचे बांधकाम प्रस्ताव फाईलमध्येच  नागरिकांमध्ये नाराजी
Advertisement

                                    मसूर पोलीस स्टेशनला इमारतीची प्रतीक्षा

Advertisement

मसूर : कराड तालुक्यातील मसूर हे गाव वाढती लोकसंख्या, व्यापारी वसाहतीचा झपाट्याने होत असलेला विरतार आणि दोन राज्य महामार्गाशी जोडलेले असल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग जवळ वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण बनले आहे.परिसरातील सुमारे ३५ गावांचे केंद्रस्थान असलेल्या, व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी २०२३ मध्ये मसूर पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले. मात्र दोन वर्षे उलटूनही या पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी इमारत उपलब्ध झाली नाही.

मसूर हे वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण ठरत असताना येथील पोलीस स्टेशन अजूनही कायमस्वरूपी इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.पोलीस स्टेशन सुरू होऊन जवळपास दोन वर्षे उलटून गेली तरीसुद्धा आजही भाड्याच्या जागेतूनच काम करावे लागत आहे.कायदा-सुव्यवस्थेचीवाढती गरज ओळखून स्वतंत्र पोलीस स्टेशन स्थापनकरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement

२०२३ मध्ये हे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाले. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. याठिकाणी पूर्वी इमारतीमध्ये दुरुक्षेत्राचे कामकाज सुरू होते. परंतु पोलीस स्टेशनच्या आवश्यकतेनुसार स्थायी इमारत उपलब्ध नसल्यामुळे तात्पुरत्यास्वरूपात गावातील आरफळ बसाहतीतील इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. त्यावेळी लवकरच नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होईल, अशी खात्री प्रशासनाने दिली होती. परंतु आजपर्यंत त्या आश्वासनाला मूर्त रूप मिळालेले नाही.

बांधकामाचा प्रस्ताव अजूनही फाइलमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, मसूर पोलीस स्टेशनसाठीची जमीन ओळख पटविण्याची प्रक्रिया काही अंशी पूर्ण झाली आहे. मात्र प्रत्यक्ष बांधकाम मंजुरी व निधी वितरण टप्प्यावर प्रस्ताव अडकलेला आहे. संबंधित विभागांमध्ये पत्रव्यवहार सुरू असला तरी कामाला गती मिळालेली नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू प्रशासनाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

Advertisement
Tags :

.