Kolhapur News : पाडळी खुर्द येथे शॉर्टसर्किटमुळे उसाला भीषण आग; 12 लाखांचे नुकसान
करवीर तालुक्यात ऊस शेती भस्मसात
कसबा बीड : पाडळी खुर्द तालुका करवीर येथे शॉर्ट सर्कीट होऊन ऊस शेतीला आग लागून जवळपास 12 लाखाचे नुकसान झाले आहे.ग्रामस्थ व आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस पाटील अर्चना सुरेश पाटील यांच्या माहितीनुसार पाडळी खुर्द येथील शेरी नावाच्या शेतामध्ये मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी 11 ते 12.00 दरम्यान आग लागली., हे वृत्त समजताच सदर भागातील शेतकरी यांनी धाव घेतली.याच शेतातून कोगे सब स्टेशनसाटी जाणारी विद्युत वाहक लाईन गेली आहे.
आगीचा लोट एवढा प्रचंड होता की दुपारच्या दरम्यान असणारे ऊन व आग यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या . आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील असलेले पाण्याचे हॉल मोटर चालू करून सुरू केले,तर काहींनी आग विझवण्यासाठी ऊस तोडून समोरील बाकीचे शेत यामध्ये आग जाणार नाही यासाठी प्रयत्न केले.पण पाण्याच्या व आगीच्या समोर कोणाचे काही येऊ शकत नाही.आगीचे लोट व आगीमुळे पेटणार आहोत व त्यातून येणारा आवाज यामधून संपूर्ण परिसर धूर आणि आगीच्या लोटामध्ये भरून गेला होता .
शिवार शेतामध्ये विलास हरी पाटील,गणपती हरी पाटील,समर्थ संजय पाटील,पांडुरंग यशवंत पाटील,जगन्नाथ पाटील, गणपती पाटील, शंकर पाटील, प्रदीप पाटील या व आदी शेतकऱ्यांच्या जवळपास 10 एकर मधील ऊस जळून खाक झाला.यामध्ये सर्वांचे मिळून जवळपास 12 लाख रुपयांचे किमान नुकसान झाले आहे. वर्षभर शेताची मशागत करायची,महागडी खते बियाणे वापरायची,अहो रात्र पाणी पाजायचं व हातात तोंडाशी आलेला हा घास या आगीच्या संकटाने हिसकावून घेतला म्हटले तरी मागे होणार नाही. शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय यामध्ये अगोदरच शेतकरी वर्ग संकटात असताना 10 एकर मधील आगीमुळे भस्मसात झालेल्या ऊस नुकसानीमुळे हवालदील झाला आहे .
ऊसाला आग लागली त्यावेळी शेतकरी विलास हरी पाटील, गणपती हरी पाटील, समर्थ संजय पाटील, पांडुरंग यशवंत पाटील,योगेश पाटील, प्रकाश पाटील अशोक कदम, अमर पाटील, जयसिंग पाटील यासह अनेक युवकांनी आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले . घटनेनंतर मंडल अधिकारी, तलाटी, कोतवाल यांनी पंचनामा केला आणि १० एकरातील जळालेल्या उसाचे सुमारे १२ लाख नुकसान झाल्याचे सांगितले.आग लागल्याची माहिती महावितरण कार्यालय कोगे व फुलेवाडी कार्यालयात दिली. यावेळी पोलीस पाटील, कृषी अधिकारी यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे केले. संबंधितांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे