For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : आटपाडीत गॅरेजला भीषण आग, स्कॉर्पिओसह लाखो रुपयांचे नुकसान

03:23 PM Oct 27, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   आटपाडीत गॅरेजला भीषण आग  स्कॉर्पिओसह लाखो रुपयांचे नुकसान
Advertisement

        अग्निशामक गाड्या वेळेत न आल्याने संताप

Advertisement

आटपाडी : आटपाडी शहरात ग्रामीण रुग्णालयालगत असलेल्या सिद्धनाथ ऑटो या चारचाकी वाहनाच्या गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत स्कार्पिओ गाडी सह गॅरेज मधील साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आगीच्या दुर्घटनेत सुमारे २२ ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आटपाडी येथे अजित चव्हाण या चार चाकी वाहन दुरुस्ती करणाऱ्या मिस्त्री यांचे गॅरेज आहे. आटपाडी शहरासह तालुक्यात हे गॅरेज प्रसिद्ध असून येथे वाहनधारकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. आटपाडी ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी सदरचे गॅरेज कार्यरत आहे. रविवारी नेहमीप्रमाणे गॅरेजचे कामकाज आटोपून गॅरेजच्या आत एक काळया रंगाची स्कॉर्पिओ लावून शटर बंद करून सर्वजण घरी निघून गेले.

Advertisement

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गॅरेजच्या बंद शटर मधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे आगीची घटना निदर्शनास आली. गॅरेजची पत्र्याचे शेड आणि शटर पूर्णपणे तापलेले असल्याने ते उघडणे अशक्य बनले. परिसरातील लोकांनी तरुणांनी विविध प्रकारे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. आटपाडी नगरपंचायत चे अग्निशामक यंत्रणा वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे आगीची तीव्रता वाढतच राहिली.

गॅरेज मधील स्कॉर्पिओ गाडी पूर्ण जळून खाक झाली. शिवाय गॅरेज मधील ऑइल अन्य साहित्य जळून सुमारे २२ ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. काही वेळाने नगरपंचायतची अग्निशामक यंत्रणा आल्यानंतर आग विझवण्याच्या प्रक्रियेला गती आली. जळणाऱ्या गॅरेजवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करून तरुणांनी ताकतीने गॅरेजचे भले मोठे दोन शटर खेचून काढले. त्यामुळे गॅरेजमधील आगीचा भडका कमी होण्यास मदत झाली. आगीची घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता.

Advertisement
Tags :

.