For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानात महामार्गावर भीषण स्फोट

06:21 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानात महामार्गावर भीषण स्फोट
Advertisement

टँकरने सिलिंडरवाहू ट्रकला दिली धडक : 200 सिलिंडरांचा स्फोट : एकाचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाले. दुदू क्षेत्राच्या मौखमपूरानजीक एका केमिकल टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकला टक्कर मारल्याने भीषण आग लागली. पाहता पाहता आग सिलिंडरपर्यंत पोहोचली आणि सुमारे 2 तासांपर्यंत 200 सिलिंडरांचा स्फोट होत राहिला. या स्फोटांचा आवाज 10 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला, तर काही सिलिंडर नजीकच्या शेतांमध्ये जाऊन कोसळले.

Advertisement

दुर्घटनेत टँकर चालक होरपळून मृत्युमुखीड पडला, तर ट्रकचालक सुदैवाने बचावला आहे. आरटीओचे वाहन पाहून घाबरलेल्या टँकरचालकाने टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्याच्या परिसरात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु समोर उभ्या असलेल्या एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकला जाऊन धडकला. यानंतर झालेल्या स्पार्किंगमुळे आग लागली आणि दोन्ही वाहने त्याच्या भक्ष्यस्थानी पडली.

आगीची तीव्रता अधिक असल्याने नजीक उभे असलेले अन्य 4-5 ट्रकही जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या 12 वाहनांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले, परंतु तोपर्यंत ट्रक आणि टँकर पूर्णपणे जळून गेले होते. तर दुर्घटनेमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला 20 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा आणि जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र कुमार सोनी यांनी घटनास्थळी जात मदतकार्याची पाहणी केली. तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करत अधिकाऱ्यांना चौकशी अणि सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Tags :

.