कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराणी बंदरात भीषण स्फोट, अनेक ठार

06:14 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तपासाला त्वरित प्रारंभ, दहशतवादी हल्ल्याची शक्यता, इराणकडून इस्रायलवर संशय व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान

Advertisement

इराणच्या दक्षिण भागात असलेल्या एका बंदरात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेकजण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 20 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र 516 जण गंभीररित्या जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या बंदराचे नाव शाहीद राजेई असे असून त्याच्या बंदर अब्बास या भागात हा स्फोट झाला आहे. स्फोटाच्या कारणांच्या तपासाला प्रारंभ करण्यात आला आहे.

हा स्फोट कसा झाला, याचा शोध घेण्यात येत आहे. हे बंदर गजबजलेले होते. हे इराणमधील सर्वाधिक कार्यरत बंदरांपैकी एक असून तेथून प्रतिवर्ष 8 कोटी टन मालाची वाहतूक केली जाते. या बंदराच्या बंदर अब्बास या धक्क्यानजीक हा स्फोट झाला. त्यामुळे बंदराची आणि धक्क्यावर उभ्या असणाऱ्या मालवाहू नौकांची प्रचंड हानी झाली आहे. या स्फोटाचा दणका एवढा मोठा होता की, बंदरावरील इमारतींच्या काचांचे आणि विटांचे अनेक तुकडे अनेक किलोमीटर अंतरापर्यंत उडाले आहेत. बंदरावरील काही इमारती या स्फोटात नष्ट झाल्या आहेत.

प्रथमदर्शनी अपघात, पण...

ही घटना प्रथमदर्शनी अपघात असण्याची शक्यता आहे. तथापि, तपास अधिकाऱ्यांनी सर्व शक्यता गृहित धरुन तपास चालविला आहे. इराणमधील काही संस्थांनी या स्फोटामागे इस्रायलचा हात आहे, असा आरोपही केला आहे. मात्र, इराण प्रशासनाने तशी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात असून तपासानंतरच खरे कारण उघड होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या स्फोटामुळे दक्षिण इराणमध्ये प्रचंड घबराट माजलेली आहे, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शी पत्रकारांनी प्रसिद्ध केली आहे.

तेलाच्या वाहतुकीवर परिणाम शक्य

या स्फोटामुळे इराणच्या अंतर्गत होणाऱ्या कच्च्या इंधन तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेलवाहतुकीच्या पायाभूत सुविधांची फारशी हानी या स्फोटात झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली असली तरी काही प्रमाणात ती झालेली असल्याची माहिती देण्यात आली.

अनेकांना इतरत्र हलविले

स्फोट घडला तेव्हा या बंदरावर 2 हजार लोकांची उपस्थिती होती, असे अनुमान आहे. त्यांच्यापैकी अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तरीही 500 हून अधिक लोक जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यापैकी अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत हा आकडा 20 असल्याची माहिती देण्यात येत होती.

महत्त्वाचे बंदर

शाहीद राजेई हे इराणचे महत्त्वाचे बंदर मानले जाते. या बंदरातून मुख्यत: टँकर्सच्या साहाय्याने वाहतूक होते. तेलाची वाहतूकही या बंदरातून मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या अमेरिकेकडून इराणवर निर्बंध घालण्यात आल्याने तेलाच्या वाहतुकीचे प्रमाण कमी झाले असले तरी इतर वस्तूंची वाहतूक केली जाते. हे बंदर आता काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article