ब्राझीलमध्ये पूरामुळे मोठी हानी
57 हून अधिक बळी हजारो बेपत्ता
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे पूर संकट निर्माण झाले असून भूस्खलनामुळे मोठी हानी झाली आहे. याचा सर्वाधिक कहर रियो ग्रांडे डो सूल या प्रांतात दिसून येत आहे. तेथे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले असून हजारो लोकांना पूरामुळे स्वत:चे घर सोडावे लागले आहे.
ब्राझीलमध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे 57 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता आहेत. बचावपथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने संबंधित क्षेत्रांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. या क्षेत्रांमध्ये 67 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर पूरामुळे 10 हजार लोक विस्थापित झाले आहेत. काही भागांमध्ये छतापर्यंत पाणी साचल्याचे दिसून आले आहेत. बचावपथक लोक आणि पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.