For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संपुआच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार

06:38 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
संपुआच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार
Advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप : श्वेतपत्रिकेवर लोकसभेत चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभेत श्वेतपत्रिकेवर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अत्यंत कठोर शब्दात विरोधकांवर टीकाप्रहार केला. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा कार्यकाळ भ्रष्टाचाराने माखलेला असून त्यांच्या काळात कोळशाची राख करण्यात आली. मात्र, मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारने  त्याला हिऱ्यात रुपांतरित केल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला.

Advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुऊवारी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. यामध्ये रालोआ सरकारच्या 10 वर्षांच्या तुलनेत संपुआ सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर प्रकाश टाकण्यात आला. 59 पानांच्या श्वेतपत्रिकेत 2014 पूर्वी आणि नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे. संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या काळात भारताला अर्थव्यवस्थेतील गैरव्यवस्थापनाचा कसा फटका सहन करावा लागला हे त्यात नमूद करण्यात आले आहे. संपुआ सरकारच्या काळातील योजना आणि घोटाळ्यांवर जोरदार हल्ला चढवताना अर्थमंत्र्यांनी अनेक आरोप केले. त्यांच्या सरकारच्या काळात रोज नवनवीन घोटाळे उघडकीस आले. दिवसेंदिवस नवनवे घोटाळे उघडकीस येत होते. आताची परिस्थिती मात्र नेमकी उलट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार प्रकरणांमुळे देशाची बदनामी झाली. कोळसा घोटाळ्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले. काँग्रेसने देश उद्ध्वस्त केला. संपुआ सरकारच्या काळात परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. सरकारी योजनांचे कंत्राट मागच्या दाराने वाटले जात होते, असे आरोप निर्मला सीतारामन यांनी केले. तसेच कोळसा घोटाळ्यावर भाष्य करताना संपुआ सरकारच्या काळात कोळशाचे राखेत आणि आमच्या सरकारने कोळशाचे हिऱ्यात रुपांतर केले, असेही त्या म्हणाल्या.

ऐकण्याची क्षमता नाही. तरीही सोडणार नाही!

सीतारामन यांनी गदारोळ करणाऱ्या विरोधी सदस्यांना चांगलेच फैलावर घेतले. श्वेतपत्रिकेचा तपशील मांडताना सीतारामन यांनी आधीच्या यूपीए सरकारच्या धोरणांवर टीका केली तेव्हा काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. गोंधळ निर्माण करणे. त्यांच्यात (काँग्रेस सदस्यांमध्ये) हिंमत असेल आणि त्यांनी चांगले काम केले असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे, असे अर्थमंत्री म्हणाल्या. ऐकण्याची क्षमता नाही. तरीही मी सोडणार नाही, मनातलं सर्व येथेच बोलून टाकणार अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Advertisement
Tags :

.