महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुवर्णविधानसौधसमोरील अपघातात करीकट्टीच्या गवंड्याचा जागीच मृत्यू

11:37 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रीय महामार्गावर हलगा येथे परिवहनच्या बसची धडक

Advertisement

बेळगाव : भरधाव बसने ठोकरल्याने करीकट्टी (ता. बेळगाव) येथील एका गवंडी कामगाराचा मृत्यू झाला आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथील सुवर्णविधानसौधजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. महादेव यल्लाप्पा बुड्री (वय 42) रा. करीकट्टी, पोस्ट तुम्मरगुद्दी, ता. बेळगाव असे त्या दुर्दैवी गवंडी कामगाराचे नाव आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., एस. आर. मुत्तत्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. केए 22 एफ 2022 क्रमांकाच्या बेळगावहून हुबळीला जाणाऱ्या बसने मोटारसायकलला ठोकरल्याने ही घटना घडली आहे. महादेव बुड्री हा सुवर्णविधानसौधसमोर महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी मोटारसायकलवर बसून होता. दुभाजकाजवळ मोटारसायकल उभी करून तो थांबला होता. याचवेळी भरधाव बसची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article