तामिळनाडूत पावसामुळे काही भागात पूरस्थिती
मदतकार्यासाठी 250 जवान तैनात
वृत्तसंस्था/ चेन्नई
हिंद महासागराजवळील तामिळनाडूच्या किनारी क्षेत्रात केप कोमिरन चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तुतीकोरीन जिल्ह्यातील तिऊचेंदूरमध्ये अवघ्या 15 तासांत झालेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सुमारे दोन फूट पाणी साचले होते. पूरसदृश परिस्थिती पाहता कन्याकुमारी, तिऊनेलवेली, तुतीकोरीन आणि तेनकासी जिह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे 250 जवान तैनात करण्यात आले आहेत.
तामिळनाडू सरकारने सोमवारी तिऊनेलवेली, थुटुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी या चार जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. तसेच बँकाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पलायमकोट्टई येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 260 मिमी पाऊस झाला. तर सोमवारी सकाळी 26 सेंमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे, कन्याकुमारीमध्ये 17 सेंमी पावसाची नोंद झाली असून थुटुकुडी जिह्यात श्रीवैकुंटम तालुक्मयात 525 मिमी पाऊस झाला. तामिळनाडूच्या थुटुकुडी जिह्यात पुरामुळे सुमारे 800 रेल्वे प्रवासी अडकले आहेत. कोविलपट्टीतील नद्या आणि तलाव ओसंडून वाहत आहेत. दोन तलाव फुटले असून त्यांच्या दुऊस्तीचे काम सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते 18-19 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी, तिऊनेलवेली, थुटुकुडी, रामनाथपुरम, पुदुकोट्टई आणि तंजावर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे.