मारुतीची प्रीमियम हॅचबॅक नव्याने सादर
बलेनो अँड्रॉइड ऑटो-ऍपल कार प्लेसह
नवी दिल्ली
मारुती सुझुकीने आपल्या प्रिमियम हॅचबॅक कार बलेनोला नव्याने सुविधायुक्त सादर केले आहे. आता या कारमधील 9-इंचाच्या स्मार्टप्ले प्रो प्लस सिस्टमला वायरलेस ऍपल कार प्ले व अँड्राईड ऑटो सपोर्ट मिळणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
मारुतीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन लुक आणि फीचर्ससह बलेनो फेसलिफ्ट लॉन्च केली. तेव्हापासून ही कार विक्रीच्या बाबतीत भारतातील टॉप-10 मध्ये राहिली आहे. नोव्हेंबरमध्ये जवळपास 21 हजार युनिट्सच्या विक्रीसह बलेनो पहिल्या क्रमांकावर होती.
ऑटो कनेक्टिव्हिटीसह इतर सुविधा
बलेनोला आता सॉफ्टवेअर अपडेटनंतर ऑटो कनेक्टिव्हिटी मिळेल. हे हँड-अप डिस्प्लेवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले ऑफर करणार आहे. ग्राहक डीलरशिपला भेट देऊन नवीन सुविधा अपडेट करू शकतात.
सध्या, हे वैशिष्टय़ फक्त जेटा आणि अल्फा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मारुतीने कार लॉन्च करताना भविष्यातील वापरासाठी ही वैशिष्टय़े राखून ठेवली आहेत. फीचर लाँच केल्यानंतर बलेनोने आता कनेक्टिंग कार सेगमेंटमध्येही प्रवेश केला आहे. बलेना फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे.