Solapur Crime : सोलापुरात विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन केला छळ
सोलापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात महेजबीन शेतसंदीची तक्रार
सोलापूर : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरखर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणत मारहाण आणि दमदाटी केल्याची घटना सन २०२३ ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान सासरी घडली.
याप्रकरणी महेजबीन मुबारक शेतसंदी (वय २७, रा. आयेशा नगर, मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती मुबारक, सासू कुलसुमबी, राजमाबी शेख, दाऊद जमादार (सर्व रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात अधिक माहिती अशी की, यातील संशयित आरोपी यांनी फिर्यादी महेजबीन शेतसंदी यांच्या चरित्र्यावर संशय घेऊन घर खर्चासाठी बाहेरून पैसे घेऊन ये म्हणून मारहाण दमदाटी केली.
तसेच संशयित आरोपी पती मुबारक याने मामाच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये म्हणून धमकी देऊन फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.