Solapur Crime : सोलापुरात इन्स्टाग्रामवर का येत नाही म्हणत केली मारहाण
पोटफाडी चौक परिसरात दहशतीचे वातावरण
सोलापूर : सोलापुरात पोटफाडी चौक येथील बाहुबली कारपेट येथे इन्स्टाग्रॅम अॅप वर का येत नाही म्हणत १० ते १२ जणांनी मारहाण केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
याप्रकरणी मोहम्मद साहब जावेद शेख (वय ३०, रा. राहुल गांधी झोपडपट्टी) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून समीररोकडा, जिलानी शेख, सिंकदर शेख, आसिफ शेख, साहिर शेख, दाऊद शेख, इतर १० ते १२ इसम नाव माहित नाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादीला संशयित आरोपींनी यांच्या इंस्टाग्रामवर ०४ नावाचे अकाउंट आहे. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर ०४ अॅप चारबर का येत नाही याचा राग मनात धरून फिर्यादी व सुफियान यांना विटांनी दंडक्याने तसेच चाकूने मारहाण करून गंभीर जखमी करून शिवगड करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.