Solapur Crime : मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ
पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सोलापूर : सोलापूर लग्नात आमचा मानमाप केला नाही, तू वांझोटी आहेस. तुला मूलही झाले नाही. तसेच कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १ सप्टेंबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२३ च्या दरम्यान मोदी हुडको सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी भारती संजय लोखंडे (वय ३० रा. कुरघोट, ता. द. सोलापूर) यांनी संजय लोखंडे (पती), भीमराव लोखंडे (सासरे), जनाबाई लोखंडे (सासू), सुजाता लोखंडे, सविता चंदनशिवे, संगीता लोखंडे (नणंद सर्व रा.मोदी हुडको सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
फिर्यादी सासरी नांदत असताना यातील आरोपीनी फिर्यादीला लग्न झाल्यापासून लग्नात आमचा मानपान झाला नाही. घरातील शुल्लक कारणावरून फिर्यादीला तुला अद्यापही मूलबाळ झाले नाही, तू वांझोटी आहेस.
कर्ज झाले आहे, ते फेडण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून मारहाण व शिवीगाळ करून शारीरिक, मानसिक त्रास दिला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार हे करत आहेत.