कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विवाहितेची दोन मुलांसह खाडीपात्रात आत्महत्या

03:19 PM Apr 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सिंधुदुर्गात खळबळ

Advertisement

देवगड- प्रतिनिधी

Advertisement

देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी येथील एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल (५) व दुर्वेश सुरज भाबल (४) अशी त्यांची नावे असून सौ. श्रीया व श्रेयस यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुर्वेश हा अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वा. च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. श्रीया या त्यांची दोन लहान मुले, सासू सासरे, दीर यांच्यासमवेत तिर्लोट– आंबेरी येथे राहत होत्या. तिचे पती सुरज भाबल हे मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. श्रियाचे माहेर कर्नाटक राज्यात आहे. दरम्यान, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास श्रिया ही श्रेयस व दुर्वेश या दोन्ही मुलांना घेऊन घरातून निघून गेली. ती पुन्हा घरी न परतल्याने रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नव्हती. १६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वा. च्या सुमारास श्रियाचा मृतदेह आंबेरी पुलानजीक आढळून आला. तर श्रेयसचा मृतदेह तेथीलच 'पिराचे पोय' याठिकाणी सापडला. दुर्वेश हा अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, हवालदार प्रशांत जाधव, एस. बी. पडेलकर, महिला पोलीस हवालदार व्ही. एस. पडवळ, पी. एस. गावडे, पी. डी. कांबळे, बी. एल. कांदे करीत आहेत.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # devgad news # sucide
Next Article