सावत्र भावाशीच केला विवाह
सर्वसाधारणत: विवाह हा आपल्या जवळच्या नात्यांबाहेर करण्याची पद्धत बहुतेक समाजांमध्ये आहे. काहीवेळा मावसभावंडे किंवा मामेभावंडे यांच्यात विवाह होतात. चुलत भावंडांचेही विवाह क्वचित प्रसंगी होत असतात. तथापि, आपल्या प्रत्यक्ष सावत्र भावाशी विवाह ही बाब कल्पनातीत मानली जाते. कारण बहीण आणि भाऊ यांच्यातील विवाह हे बहुतेक सर्व आधुनिक समाजांमध्ये निषिद्ध मानण्यात येतात. सामाजिक किंवा सांस्कृतिक नियम आणि विज्ञानाही अशा विवाहांचे समर्थन करत नाही. तथापि, सध्या अशा एका विवाहाची जोरदार चर्चा आहे.
लिंडसे ब्राऊन आणि कॅड ब्राऊन हे सावत्र बंधू-भगिनी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते त्यांना पूर्णपणे माहीती होते. म्हणजेच, विवाहाचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला होता. त्यांच्या या अनोख्या विवाहाला काहीसा विरोधही झाला. पण त्यांनी माघार घेतली नाही. नंतर हा विवाह पार पडला. त्यांना दोन मुलेही झाली आहेत.
आता त्यांच्या मुलांचे त्यांच्याशी नाते नेमके कसे मानायचे याची चर्चा होत आहे. कारण, ती त्यांची मुले म्हणजे अपत्ये तर आहेतच. पण ती त्यांची भाचा आणि भाचीही आहेत. कारण त्यांचे आईवडील एकमेकांचे भाऊ-बहीण आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांपैकी जी मुलगी आहे ती वडिलांची भाचीही (बहिणीची मुलगी) आहे आणि जो मुलगा आहे तो वडिलांचा भाचाही लागतो. अर्थात, हे नाते सावत्र आहे. त्यांच्या कन्येसंबंधीही हीच परिस्थिती आहे. कायदेशीरदृष्ट्या मात्र, ती त्यांची अपत्ये म्हणूनच गणली जाणार जातील, अशी स्थिती आहे.