धावत्या रेल्वेमध्येच केला विवाह
रेल्वेतच दिली मोठी पार्टी
जगात अनेक प्रकारचे लोक असतात आणि त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक अत्यंत मोठ्या विवाहसोहळ्याची हौस बाळगून असतात तर काही जणांना साध्या स्वरुपातील विवाहसोहळा पसंत असतो. याचमुळे विविध जोडपी स्वत:च्या बजेट आणि पसंतीनुसार विवाहाचे स्थळ निवडत असतात. परंतु एका जोडप्याने स्वत:च्या विवाहासाठी अत्यंत वेगळ्या प्रकारचे स्थळ निवडले आहे.
तुम्ही लोकांना स्वत:च्या विवाहासाठी डेस्टिनेशन आणि थीम निवडताना पाहिले असेल. हे लोक स्वत:चा विवाहसोहळा संस्मरणीय ठरावा यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. परंतु एका ब्रिटिश जोडप्याने स्वत:च्या विवाह सोहळ्यासाठी निवडलेले स्थळ सामान्य नाही. या जोडप्याने कुठलेही मोठे रिसॉर्ट किंवा हॉटेल निवडलेले नाही. तर विवाह करण्यासाठी ते रेल्वेत पोहोचले, याकरता खास तयार करण्यात आली आणि मोठ्या पार्टीचेही आयोजन झाले.
ग्रेट वेस्टर्न रेल्वेमध्ये एका जोडप्याने स्वत:च्या विवाहाची पार्टी दिली आहे. 125 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेत वधू आणि वराने आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली आणि सोहळ्यासाठी उपस्थित अतिथींना खाऊ घातले आहे. 38 वर्षीय लेह आणि 39 वर्षीय विंसचा हा विवाहसोहळा अनोखा होता. या दोघांची भेट ग्रेस्ट वेस्टर्न रेल्वेमध्येच झाली होती. यामुळे त्यांनी स्वत:च्या विवाहासाठी स्थळ म्हणून रेल्वेची निवड केली आणि सर्वांना रेल्वेमध्येच आमंत्रित केले.
प्रेमकथेचा साथीदार
या विवाहसोहळ्यात भाषणंही झाली, सोहळ्यात रुचकर खाद्यपदार्थ वाढण्यात आले आणि शॅम्पेन देखील वाटण्यात आली आणि हे सर्वकाही रेल्वे धावत असताना घडले आहे. रेल्वे आमच्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा राहिली आहे. आम्ही दोघेही सर्वप्रथम रेल्वेतच भेटलो होतो आणि 8 वर्षांपूर्वी डेट देखील रेल्वेमध्येच केली होती. अशा स्थितीत विवाहसोहळा स्मरणीय व्हावा म्हणून आम्ही रेल्वेची निवड केल्याचे लेह सांगते.