विवाह नोंदणी आता ऑनलाईन करता येणार
07:00 AM Feb 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : नवविवाहित जोडप्याला विवाह नोंदणीसाठी उपनोंदणी कार्यालयात जावे लागते. मात्र आता ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेही करता येणार आहे. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदू विवाह कायद्यात दुरुस्ती करण्यास संमती दर्शविण्यात आली आहे. हिंदू विवाह नोंदणी कायदा दुरुस्ती विधेयक-2024 मांडण्यात आल्यानंतर विवाह नोंदणी ऑनलाईन होईल. आतापर्यंत उपनोंदणी कार्यालयात जाऊन विवाह नोंदणी करावी लागत होती. आता ग्राम वन, कावेरी-2 सॉफ्टवेअरवर नोंदणी करता येणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article