इभ्रतीला बळी न पडता लग्न करायचे आहे, 85 वर्षांपूर्वीची 'ती' लग्नपत्रिका काय सांगते?
काळाच्याही एक पाऊल पुढे उचलत सघन असूनही मुलाचा विवाह साधेपणाने केला
By : मानसिंगराव कुमठेकर
मिरज : सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणावरून थाटात केल्या जाणाऱ्या शाही लग्रावर चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात लग्रविधी थाटामाटात केले जातात. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढून बडेजाव केला जातो. श्रीमंती व मोठेपणा मिरवण्यासाठी लाखोंची उधळपट्टी केली जाते. अशा शाही लग्रांवर टीकाही होते. लग्रांवर होणारा खर्च कमी करावा, असे प्रबोधन केले जाते. मात्र त्यातून फारसा धडा घेतला गेल्याचे दिसत नाही.
मात्र ८३ वर्षांपूर्वी तत्कालीन तासगाव तालुक्यातील सोनी (सध्याचा मिरज तालुका) गावच्या खांदवे कुटुंबांनी मात्र ऐपत असतानाही लग्रविधी बडेजाव न करता केला. लग्रात कोणाकडून आहेर घेतले नाहीत. त्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
गेली आठवडाभर वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर प्रतिष्ठितांचे विवाह आणि त्यासाठी केला जाणारा खर्च यांच्यावर चर्चा होत आहेत. अशा लग्नात केवळ सामाजिक प्रतिष्ठेपायी मुलीकडून लाखोंचा हुंडा घेऊन डोळे दीपवतील असे सोहळे घडवून आणले जातात. त्यासाठी प्रसंगी कर्जही काढले जाते. प्रतिष्ठा मिरवण्यासाठी अशी लग्ने लावली जातात.
एकीकडे गोरगरीबांच्या पालकांकडे मुलांच्या लग्नासाठी पुरेसे पैसे नसतात, तर दुसरीकडे समाजातील प्रतिष्ठीत लाखोंचा चुराडा करतात. सामान्यही त्यांचे अनुकरण करीत प्रसंगी कर्ज काढून असे विवाहसोहळे घडवून आणतात. मात्र, ऐपत असतानाही अशा भव्य सोहळ्यांना फाटा देण्याचा क्रांतिकारी निर्णय सोनी या छोट्याशा गावातील गणेश खांदवे यांच्या कुटुंबियांनी ८५ वर्षांपूर्वी घेत आदर्श निर्माण केला.
त्यांनी काळाच्याही एक पाऊल पुढे उचलत सघन असूनही मुलाचा विवाह साधेपणाने केला. आणि पत्रिकेवर प्रबोधनपर संदेश लिहून समाजाकडून अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांची पुरोगामी कृती गाजली होती. गणेश खांदवे यांनी मुलाच्या लग्रपत्रिकेत लग्रविधी हा बडेजाव मिरवण्यासाठी केला जाऊ नये, अशा आशयाचे प्रबोधनपर वाक्य लिहिले आहे.
त्याचबरोबर आहेर वगैरे मुळीच स्वीकारले जाणार नाहीत, असेही लिहिले आहे. सोनीतील गणेश खांदवे हे तत्कालीन मोठे व्यापारी आणि सधन शेतकरी होते. रघुनाथ नावाच्या त्यांच्या मुलाचा विवाह मणेराजुरी येथील विश्वनाथ हिंगमिरे या सधन गृहस्थाच्या नातीशी ठरला होता.
सन १९४० च्या मे महिन्यात सोनी येथे हा विवाह झाला. दोन्हीकडची कुटुंबे सुखवस्तू होती. त्यांना लग्र शाहीपद्धतीने करता आले असते. मात्र, खांदवे यांनी मुलाचे लग्र साध्या पद्धतीने केले. लग्रविधी हा इभ्रतीला बळी न पडता करण्याचा आहे', असे प्रबोधनपर वाक्य त्यांनी लग्रपत्रिकेवरच छापून घेतले होते.