कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटकांना खुणावतेय मार्लेश्वर तीर्थक्षेत्र

01:53 PM May 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

देवरूख / सुरेश करंडे :

Advertisement

सह्याद्रीच्या उंच कड्यांमधून फेसाळत वाहणारी नदी, हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात उंचावरून कोसळणारा धवचवा जणू दूधसागर. सहबाद्रीच्या कडेकपारीत बसलेले श्री स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानव्या शेजारी मुसळधार पावसामुळे चक्क मे महिन्यातच धारेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. यंदा मे महिन्यातच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला आहे. येथील धबधबा लक्षवेधी ठरत आहे. या धबधब्यामुळे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र पर्यटकांना खुणावत असून दुधाळ व फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांची पावले तीर्थक्षेत्री वळत आहेत.

Advertisement

सह्याद्रीच्या कडेकपारीत, संगमेश्वर तालुक्यात मारळ नगरीत श्री मार्लेश्वर देवस्थान वसलेले आहे. नवसाला पावणारे हे देवस्थान आहे. मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने तसेच चाकरमानी गावी येतात. गणपतीपुळे पाठोपाठ मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दाखल होतात. मात्र पावर्षी मे महिन्याच्या प्रारंभी पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली होती मे महिन्यात पर्यटकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात. पाचच्या चढताना घामाच्या जणू धारा लागतात. मान्सूनपूर्व पावसाने चक्क मे महिन्यात हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.

मे महिन्यातही संथपणे वाहणारा पारेश्वर धबधबा पावसामुळे पुन्हा ओसंडून वाहत आहे डोंगर कपारीतील छोटे छोटे घबंधचे प्रवाहित झाले आहेत. कडेकपारीत चहुबाजूने गर्द झाडी होळ्याचे पारणे फेडत आहे. हे नयनरम्य दृश्प पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तीर्थक्षेत्री वळू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पर्यटक मंगळवारी तीर्थक्षेत्री दाखल झाले होते. काहींनी रेनकोट, छत्र्या घेऊन तर काही पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मार्लेश्वर चरणी लीन होण्याबरोबर नयनरम्य दृश्य प्रत्येकाने कॅमेराबध्द  केले.

खबरदारी म्हणून मार्लेश्वर देवस्थानने धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. पर्यटक व माचिकांसाठी याबाबतचा फलक लावण्यात आला आहे.

वयोवृध्द मंडळीना देखील तीर्थक्षेत्राची भुरळ पडत आहेत. ब्रेड पेथील १०० वर्षीय वीर पत्नी नानीबाई रामजी जाधव यानी कुटुंबासमवेत हातात काठी घेऊन ५०० हुन अधिक पायऱ्या बढून तीर्थक्षेत्री येत मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दर्शन घेतले आणि निसर्गाचा आनंद लुटला.

मे महिन्यात धारेश्वर यबधब्याला पाणी एकदम कमी असते अनेक वर्षानंतर चक्क मे महिन्यात हा पबधबा ओसंडून वाहत आहे. पंदा में महिन्यात पर्यटकांची संख्या कमी होली. मुसळधार पावसाने घारेश्वर धबयया व डोंगरातून अन्य छोटे - छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी गेल्या चार पाच दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढत्ती आहे. अचानक पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करता आती नाही. मात्र काही दिवसातच ही व्यवस्था मार्गी लागेल

                                                                                             - सुनील सावंत, मारळ मार्लेश्वर देवस्थान विश्वस्त

मे महिन्यात पर्यटकांची मार्लेश्वर तीर्थक्षेत्री वर्दळ असते. या कालावधीत व्यवसाय तेजीत असतो. दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात व्यापाऱ्यांनी माल भरून ठेवला होता. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने त्यातच जोरदार पाऊस सुरू झाल्याने मालाची विक्री झालेली नाही. पावसाळी वातावरणामुळे माल खराब होऊन व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे.

                                                                                                           - प्रशांत सावंत, व्यापारी, मारळ,

मार्लेश्वर देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. अनेक ठिकाणी पर्यटनस्थळी सोयीसुविधांची कमतरता असते. परिसरात स्वच्छता महत्वाची असते. यासाठी प्रशासन, देवस्थानला पर्यटकांनी सहकार्य केले पाहिजे.

                                                                                                           - कृष्णा जाधव, खेड, पर्यटक

वीस- बावीस वर्षांनी मी पुन्हा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री आलो आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. झालेला बदल व निसर्गरम्य परिसर पाहून मनाला खूप समाधान वाटले. चक्क मे महिन्यात धबधबे वाहू लागल्याने जुलै महिन्याच्या वातावरणाच्या अनुभव घ्यायला मिळत आहे. पर्यटकांना भुरळ घालणारे हे ठिकाण आहे. पर्यटकांनी आवर्जून तीर्थक्षेत्री भेट द्यावी.

                                                                                                             - जयंत चिंदरकर, पर्यटक, खारेपाटण

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article