कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुड फ्रायडेच्या पूर्व संध्येला बाजाराची उसळी

07:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 1509 अंकांनी वधारला : बँकांचे समभाग चमकल

Advertisement

मुंबई : भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात स्थानिक शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाले, कारण टॅरिफच्या चिंतेमुळे अमेरिकन शेअर बाजारात मंदीचे वातावरण होते. सुरुवातीला बाजार घसरल्यानंतर, व्यवहारात दुसऱ्या सत्रात बाजारात सकारात्मक सुधारणा झाल्याचे दिसून आले. यामुळे बीएसई सेन्सेक्स 1500 अंकांनी उसळला, तर निफ्टीही 400 अंकांच्या पुढे राहिला होता.  दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 76,968.02 वर उघडला. मात्र अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स 1508.91 अंकांनी वधारुन निर्देशांक 1.96 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 78,553.20 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी देखील घसरला. अंतिमक्षणी तो  414.45 अंकांनी वाढून 23,851.65 वर बंद झाला. दरम्यान बँकिंग निर्देशांकात मजबूत आधारावर राहिल्याने बाजाराला बळ मिळाले आहे.

Advertisement

बाजारात वाढ होण्याची प्रमुख कारणे

जागतिक बाजारपेठेतून कोणते संकेत मिळत आहेत?

बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली, ज्याचा परिणाम आशियाई बाजारांवर आणि भारतावरही दिसून येतो. टेक समभागांमधील विक्रीमुळे अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले. विशेषत:, एनव्हीडिया (एनव्हीडिया)चे समभागांमध्ये मोठी घसरण झाली. त्याच वेळी, यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यापार शुल्काबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की महागाई नियंत्रित करताना आर्थिक वाढ राखणे आव्हानात्मक असू शकते.

आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.7 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.45 टक्के आणि ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 निर्देशांक 0.28 टक्के वधारला. हाँगकाँगचा हँग सेन्ग निर्देशांक 0.42 टक्के वधारला, तर चीनचा सीएसआय 300 निर्देशांक 0.19 टक्के घसरला. विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर, वाहन, औषध आणि आरोग्यसेवा वगळता निफ्टी तेजीसह बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात सर्वात जास्त वाढ दिसून आली, ज्याने 2.37 टक्के पर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article