कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाजाराची दमदार तेजीसह आठवड्याची सुरुवात

06:29 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 1 हजार अंकांनी बहरला : धातू कंपन्या चमकल्या

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस भारतीय शेअरबाजाराने दमदार तेजीसह गाजवला. बँकिंग आणि धातु कंपन्यांच्या तेजीमुळे सेन्सेक्स 1 हजार अंकांनी तेजीत राहिला होता. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1005 अंकांच्या दमदार तेजीसोबत 80218 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 273 अंकांनी वाढत 24312 अंकांवर बंद झाला. बँकिंग, धातू आणि फार्मा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची सोमवारी जोरदार खरेदी दिसली. एफएमसीजी आणि आयटी कंपन्यांचे समभाग मात्र दबावात होते. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 23 समभाग हे तेजीसोबत बंद झाले आहेत तर उर्वरीत 7 समभाग कमकुवत होत बंद झाले.

आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. जपानचा निक्केई 134 अंकांनी वाढत व्यवहार करत होता आणि कोरीयाचा कोस्पी 2.56 अंकांनी अल्पसा तेजीत होता. चीनमधील शांघाई कम्पोझीट 6.65 अंकांनी घसरणीत होता तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 8.78 अंकांनी घसरणीत होता. 25 एप्रिलला अमेरिकेतील डो जोन्स 20 अंक, नॅस्डॅक कम्पोझीट 216 अंक आणि एस अँड पी-500 निर्देशांक 40 अंक तेजीसह बंद झाले होते.

बाजारात तेजीची कारणे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून शुल्काची आकारणी थांबवली असून दोन्ही देशातील व्यापार कराराला गती मिळण्याची शक्यता वाढली असून त्याचे पडसाद बाजारावर दिसले. चीनला अमेरिकेकडून व्यापार शुल्कात कोणतीही सवलत मिळणार नाही. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना लघुअवधीत चमकण्याची संधी मिळण्याच्या आशेने बाजारात उत्साह होता. विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात खरेदी करत आहेत. 21 ते 25 एप्रिल दरम्यान 17,245 कोटी रुपयांचे समभाग त्यांनी खरेदी केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article