कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संमिश्र संकेतामुळे बाजार वधारला

07:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 443 तर निफ्टी 130 अंकांवर मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्यांदा तेजीसह बंद झाला. आठवड्याच्या समाप्तीनंतरही, बाजारात खरेदी दिसून आली. ब्रोकरेज कंपन्यांच्या तेजीच्या दृष्टिकोनामुळे, औषध कंपन्यांचे समभाग वधारले आणि त्याचा बाजारावरही परिणाम झाला. याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याजदरात आणखी कपात होण्याची अपेक्षा असल्याने बाजार वाढण्यास मदत झाली.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी सेन्सेक्स 150 अंकांपेक्षा अधिकने वाढून 81,196.08 वर उघडला. अंतिम क्षणी सेन्सेक्स 443.79 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 81,442.04 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी  अखेर 130.70 अंकांच्या वाढीसह 24,750.90 वर बंद झाला. विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या क्षेत्रात निफ्टी फार्मा आणि रिअॅल्टी निर्देशांकात अनुक्रमे 1 टक्के आणि 2 टक्के वाढ नोंदवली गेली. याशिवाय निफ्टी हेल्थकेअरमध्ये 1 टक्के वाढ नोंदवली गेली. निफ्टी पीएसयू बँकेत सर्वाधिक 0.63 टक्के घसरण नोंदवली गेली.

आरबीआयच्या आजच्या निर्णयाकडे नजर

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. या बैठकीमधील अंतिम निर्णय आज आरबीआय पत्रकार परिषद घेत गव्हर्नर सादर करणार आहेत. यामध्ये आरबीआयच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी करून 5.75 टक्के करेल अशी अपेक्षा आहे.

 जागतिक बाजारातून

गुरुवारी आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यवहार झाले. अमेरिकेतील खासगी क्षेत्रातील नोकरीच्या कमकुवत आकडेवारीमुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवर व्यापार धोरण अनिश्चिततेचा परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. जपानचा निक्केई निर्देशांक घसरत होता. कोस्पी 0.95 टक्के वाढला, तर एएसएक्स 200 0.2 टक्के वाढला. वॉल स्ट्रीटवर, डाऊजोन्स 0.22 टक्के घसरला. एस अॅण्ड पी 500 0.01 टक्क्यांनी वर आला. डेटाच्या बाबतीत, बाजाराची नजर अमेरिकेच्या सुरुवातीच्या बेरोजगारी दाव्यांवर, एप्रिलमधील व्यापार डेटावर, चीनच्या मे महिन्यातील पीएमआयवर आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या दर निर्णयावर असेल. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 4 जून रोजी 1,076.18 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. याचप्रमाणे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी  2,566.82 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article