कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एचडीएफसी-आयटीसीच्या कामगिरीमुळे बाजार सावरला

06:10 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स सलग सहाव्या दिवशी तेजीत: जागतिक वातावरणाचा प्रभाव

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक बाजारांमधील सकारात्मक स्थितीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. मुख्य कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसह अन्य कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स मंगळवारी 79,728.39 अंकांवर उघडला. सुरवातीला चढउतार पाहायला मिळाले. दिवसअखेर, सेन्सेक्स 187.09 अंकांनी वधारत निर्देशांक 0.24 टक्क्यांसह वाढून 79,595.59 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 41.70 अंकांनी वाढून 24,167.25 वर बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 14 कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. यामध्ये एफएमसीजी समभाग आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इटरनल, एसबीआय, कोटक बँक, सन फार्मा यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. दुसरीकडे, इंडसइंड बँकेचे समभाग 4 टक्क्यांपेक्षा अधिकने घसरून बंद झाले. घसरणीत पॉवरग्रिड, भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि टाटा स्टील यांचा समावेश होता.

सेन्सेक्स निर्देशांक 6 ट्रेडिंगमध्ये वाढला

गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये, बीएसई बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स 7.8 टक्के किंवा 5,749 अंकांनी वाढला आहे. मंगळवारी 29 वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या एनएसई बेंचमार्क निफ्टी-50 मध्ये गेल्या सहा दिवसांत 7.9 टक्के किंवा 1,768 अंकांनी वाढ झाली आहे.

अमेरिकन बाजारांमध्ये घसरण

वॉल स्ट्रीटवर, डाओ जोन्स 2.48 टक्क्यांनी घसरून 38,170.41 वर बंद झाला. एस अँड पी-500 2.36 टक्क्यांनी घसरून 5,158.20 वर बंद झाला. नॅस्डॅक कम्पोझिट 2.55 टक्क्यांनी घसरून 15,870.90 वर बंद झाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article