कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराण-इस्रायल संघर्षाने बाजारात पडझडीचे सत्र

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 83 तर निफ्टी 19 अंकांनी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांमधील पडझड सुरुच राहिली असल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. त्यामधून अजून ठोस मार्ग निघालेला नाही. तोवर आता इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षाचा भारतीय बाजारात दबाव निर्माण होत आहे. सदरच्या दबावानेच चालू आठवड्यात गुरुवारी सलग तिसरे सत्र घसरणीसह बंद झाले आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 82.79 अंकांनी घसरुन निर्देशांक 81,361.87 वर बंद झाला आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 18.80 अंकनी प्रभावीत होत निर्देशांक 24,793.25 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी गुरुवारी अदानी पोर्ट, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि नेस्ले इंडिया यासारख्या कंपन्यांचे समभाग हे 2.50 ते 1.25 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. दुसऱ्या बाजूला मात्र महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टायटन, मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग तेजीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅपमध्ये क्रमश:  1.63 ते 1.99 टक्क्यांची घसरण राहिली आहे.

गुंतवणूकदारांना पुन्हा दणका

या दरम्यान बीएसईमधील लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य जवळपास 446.3 लाख कोटी रुपयावरुन ते 442.5 लाख कोटीवर आले आहे. यातून गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण येत्या काळात लवकर निवळले नाही तर येत्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढून पुन्हा महागाईची झळ बसण्याची शक्यता आर्थिक अभ्यासक व्यक्त करत आहेत. यावर जागतिक पातळीवर काय समीकरणे घडतात यावरच या सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहेत.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article