महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन सत्रांच्या तेजीनंतर बाजार घसरणीत

06:38 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 203 अंकांनी घसरणीत : नव्या विक्रमाला गवसणी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला. तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागतानाच सेन्सेक्स निर्देशांक 203 अंकांनी कमकुवत होत बंद झाला. सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकांनी याचदरम्यान सुरुवातीच्या सत्रात नवा विक्रमी स्तर प्राप्त केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या बातमीने सकाळी सुरुवातीलाच शेअरबाजाराने नवी विक्रमी पातळी गाठली होती. सेन्सेक्स निर्देशांकाने 77079 ची नवी पातळी तर निफ्टीने 23411 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 203 अंकांनी घसरून 76,490 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी घसरून 23,259 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील आयटी निर्देशांक जवळपास 2टक्के इतका घसरणीसह बंद झाला होता. बाजारात सोमवारी दिवसभरामध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. सेन्सेक्स दिवसाच्या सत्रात कधी तेजीत तर कधी घसरणीत होता. बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांक अल्पशा तेजीसह बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, पावरग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी लाइफ यांचे समभाग वधारले होते. टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि एचडीएफसी बँक यांचे सहभाग मात्र नुकसानीसोबत बंद झाले होते. सोमवारी अल्ट्राटेक सिमेंट, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, टाटा स्टील, डिव्हिज लॅब्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. मल्टीबॅगर समभागांमध्ये पाहता टीटागढ रेल, टॅक्स मेको रेल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, एनटीपीसी, इरकॉन इंटरनॅशनल आणि आयआरसीटीसी यांचे समभाग तेजी दाखवत बंद झाले. कंटेनर कॉर्पोरेशन, रेल विकास निगम, कोल इंडिया, माझगाव डॉक यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article