महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक संकेतामुळे बाजार मजबूत

06:29 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दूरसंचार, टेक आणि कंझ्युमर ड्युरेबलच्या समभागांमध्ये चमक

Advertisement

मुंबई :

Advertisement

’भारतीय भांडवली बाजारातील मागील सत्रांमधील तेजी कायम राहिली आहे. मात्र गेल्या आठवड्यामध्ये जागतिक पातळीवर निर्माण झालेली दबावाची स्थिती यामुळे भारतीय बाजारात पडझडीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत राहिले आहेत.

दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स हा 89.83 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 73,738.45 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 31.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,368.00 वर बंद झाला आहेत. निफ्टीमध्ये मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉलकॅपमध्ये 1 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी राहिली आहे. निफ्टीत आयटी, बँक, ऑटो आणि एफएमसीजी यांचे निर्देशांक तेजीत राहिले होते.

मुख्य कंपन्यांमध्ये मंगळवारी सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, टाटा मोर्ट्स, एचसीएल टेक, एनटीपीसी, एशियन पेन्ट्स आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग प्रामुख्याने लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांचे समभाग हे प्रामुख्याने घसरणीसोबत बंद झाले आहेत.

मागील आठवड्यात जागतिक पातळीवर निर्माण झालेली दबावाची स्थिती ही आता काहीशी निवळत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये फेडरल रिझर्व्ह, इराण व इस्रायल यांच्यातील तणावाची स्थिती ही काहीशी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम झाला. आगामी काळात बाजारांची काय दिशा राहणार हे पहावे लागणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर सर्वच बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकेतील बाजार तेजीत होते. डोव्ह जोन्स 116 व नॅसडॅक 152 अंकांनी तेजीत व्यवहार करत होता. युरोपासह आशियाई बाजारात तेजी होती. निक्केई 113 तर हँगसेंग 317 अंकांनी तेजीत होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article