धातू-औषध कंपन्यांमुळे बाजार घसरला
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीवर भर
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कर लादल्यामुळे आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे भारतीय बाजार घसरणीत राहिला. दरम्यान, ट्रम्प कर निर्णय गुंतवणूकदारांनी काहीसा स्वीकारला होता, परंतु अंतिम क्षणी बाजारात विक्री झाली, यामुळे बाजार काहीसा घसरत बंद झाला. सेन्सेक्स गुरुवारी 545.81 अंकांनी घसरून 80,695.50 वर उघडला. परंतु शेवटी तो 296.28 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 0.36 टक्क्यांनी घसरून 81,185.58 वर स्थिरावला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अखेर 86.70 अंकांनी घसरून 24,768.35 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक घसरले. ते 2.20 टक्क्यांनी घसरले. याशिवाय, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, रिलायन्स, एनटीपीसी, एशियन पेंट्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, टायटन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. यासोबतच, इटर्नल, आयटीसी, कोटक बँक, पॉवर ग्रिड आणि टेक महिंद्रा आघाडीवर राहिले. व्यापक बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.93 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 1.05 टक्क्यांनी घसरून बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी मेटल्स इंडेक्स आणि निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये सर्वाधिक 1.48 टक्क्यांनी घसरण झाली.
जागतिक बाजारातले चित्र
आशियाई बाजारातील बहुतेक निर्देशांकही घसरणीत होते. टॅरिफ लागू होण्याची अंतिम मुदत जवळ येताना हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा सीएसआय 300 निर्देशांक सर्वात जास्त तोट्यात होते. ा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर निशाणा साधत म्हटले आहे की भारत जगातील सर्वाधिक टॅरिफ लादणाऱ्या देशांमध्ये आहे आणि त्यांचे व्यापार नियम कठोर आहेत. ट्रम्प यांनी रशियाकडून भारताच्या ऊर्जा आयातीवर आणखी निर्बंध घालण्याचा इशाराही दिला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एचयुएल 2521
- जियो फायनॅन्शीयल 329
- इटर्नल 307
- आयटीसी 411
- जेएसडब्ल्यू स्टील 1048
- कोटक महिंद्रा 1978
- नेस्ले 2247
- पॉवरग्रिड कॉर्प 291
- अपोलो हॉस्पिटल 7498
- हिरो मोटोकॉर्प 4260
- एसबीआय लाइफ 1840
- टेक महिंद्रा 1463
- टाटा कंझ्यु. 1073
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी एंटरप्रायझेस 2430
- टाटा स्टील 157
- डॉ. रे•िज लॅब्ज 1270
- सनफार्मा 1706
- अदानी पोर्टस् 1373
- रिलायन्स 1390
- एनटीपीसी 334
- भारती एअरटेल 1914
- कोल इंडिया 376
- भारत इले. 383
- टायटन 3347
- हिंडाल्को 683
- एशियन पेंटस् 2396
- लार्सन टुब्रो 3636
- विप्रो 258
- इन्फोसिस 1509
- एसबीआय 796
- बजाज फिनसर्व्ह 1948
- एचसीएल टेक 1467
- टीसीएस 3036
- ट्रेंट 5018
- अॅक्सिस बँक 1068
- बजाज ऑटो 8008
- ग्रासिम 2746
- बजाज फायनान्स 881
- एचडीएफसी बँक 2018
- इंडसइंड बँक 798
- टाटा मोटर्स 665