For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात घसरण

06:35 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात घसरण
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

इराण-इराक हल्ल्याचा परिणाम : सेन्सेक्स 845 अंकांनी घसरणीत इराण आणि इस्त्राइल यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांक 845 अंकांनी घसरणीत राहिला होता.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 845 अंकांनी घसरून 73,399 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 241 अंकांनी घसरून 22,277 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात घसरणीचा कल पाहायला मिळाला. इस्त्राइल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम बाजारात दिसून आला. शेअर बाजारात ओएनजीसी कंपनीचे समभाग तेजी दाखवत बंद झाले तर श्रीराम फायनान्सचे समभाग तीन टक्के इतके घसरणीत होते. महिंद्रा आणि महिंद्रा यांनी ऊर्जा प्रकल्पांसाठी 15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक कर णार असल्याची माहिती शेअर बाजाराला दिली.

Advertisement

शेअर बाजारात सोमवारी सर्वच निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले आहेत. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी आयटी निर्देशांक 1.61 टक्के इतका घसरणीत होता. सोबत बीएसई स्मॉल कॅप 1.56 टक्के नुकसानीत होता निफ्टी बँक निर्देशांकात देखील जवळपास 1.64 टक्के इतकी घसरण पाहायला मिळाली.

काही ठराविक कंपन्यांचे समभाग सोमवारी तेजीसोबत बंद झाले. त्यामध्ये ओएनजीसी, हिंडाल्को, मारुती सुझुकी, नेसले इंडिया, ब्रिटानिया, सन फार्मा आणि एनटीपीसी यांचा समावेश होता. तर दुसरीकडे श्रीराम फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, आयसीआयसीआय बँक, आयशर मोटर्स, अदानी पोर्टस आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीसमवेत बंद झाले. सोमवारी बाजारात जरी घसरण असली तरी एस्टर डीएम हेल्थ, आनंद राठी वेल्थ, एक्साइड इंडस्ट्रीज, हिंडाल्को आणि इंडस टॉवर यांच्या समभागाने 52 आठवड्यानंतर सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यात यश मिळवले होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभाग घसरणीत होते.

Advertisement
Tags :

.