महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नागपंचमी सणासाठी बाजारपेठेला बहर

11:18 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन दिवसांवर सण, बाजारात खरेदीची लगबग : पावसाने उसंत घेतल्याने खरेदीसाठी गर्दी

Advertisement

बेळगाव : नागपंचमीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. नागपंचमीबरोबर श्रावणमासालाही प्रारंभ झाल्याने बाजारपेठेला बहर येत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. विशेषत: नागपंचमीसाठी चिवड्याचे पोहे, शेंगदाणे, फुटाणे, चिक्कीचे गूळ, लाह्या, खोबरे, आदींची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे चिरमुरे, फुटाणे विक्री करणाऱ्या दुकानांमधून नागरिकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासून नागपंचमीचे साहित्य खरेदीसाठी लगबग पाहावयास मिळाली. चिवडा व लाडूचे पोहे 70 रुपये किलो, भाजके शेंगदाणे 130 ते 140 रुपये किलो, फुटाणे 100 ते 120 रुपये किलो, चिरमुरे 6 रुपये लिटर, लाह्या 20 रुपये लिटर, गूळ 50 ते 52 रुपये किलो असा दर आहे. विशेषत: चिक्की गुळालाही मागणी वाढू लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा नागपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती काहीशा वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

Advertisement

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध रंगांमध्ये दाखल झालेल्या नागमूर्ती आकर्षित करू लागल्या आहेत. साधारण 30 ते 80 रुपये अशा यांच्या किमती आहेत. सोमवारपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारात विविध फळे, फुले आणि पूजेच्या साहित्याची लगबग पाहावयास मिळत आहे. त्यातच शुक्रवारी नागपंचमीचा सण असल्याने बाजारात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. मंगळवार बाजारपेठेचा सुटीचा दिवस असला तरी नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळाली. नागपंचमीच्या सणाची खरेदी करण्यासाठी बेळगाव स्थानिकांसह चंदगड, आजरा, खानापूर, गोवा येथून ग्राहक दाखल झाले आहेत. विशेषत: चिरमुरे, फुटाणे, चिवड्याच्या पोह्यांना आणि तयार चिवड्याला मागणी वाढू लागली आहे.

नागपंचमी अन् श्रावणासाठी बाजारपेठ सज्ज

सोमवारपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला. त्याबरोबरच शुक्रवारी नागपंचमीचा सण असल्याने बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे दमदार पावसानंतर सणांसाठी बाजारपेठ बहरू लागली आहे.

पावसाची उसंत बाजारात गर्दी

मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बाजारपेठ पूर्वपदावर येऊ लागली आहे. श्रावण आणि नागपंचमीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी हळुहळू वाढू लागली आहे. मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पावसामुळे बाजारपेठ विस्कळीत झाली होती. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारपेठ पुन्हा सणाच्या पार्श्वभूमीवर पूर्ववत होऊ लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article