कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चढउताराच्या प्रवासात बाजार प्रभावीत

06:25 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 46 तर निफ्टी 1.75 अंकांनी नुकसानीत : आर्थिक क्षेत्रातील समभागांना सर्वाधिक फटका

Advertisement

मुंबई :

Advertisement

चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी भारतीय भांडवली बाजारात जागतिक पातळीवरील चढउताराच्या प्रवासात बाजारात प्रभावीत होत बंद झाला आहे. दरम्यान आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीचा परिणामही बाजारावर राहिला होता. यामध्ये बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण राहिली आहे. तर मारुतीच्या नेतृत्वात वाहन क्षेत्रांच्या समभागांमध्ये खरेदीचा मोहोल राहिल्याने बाजाराला काहीसा हातभार मिळाला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स काहीशा तेजीसोबत सकाळी 80,370.80 वर खुला झाला. मात्र दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 46.14 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 80,242.24 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 1.75 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,334.20 वर बंद झाला.

मुख्य कंपन्यांपैकी बुधवारी बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग 5 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यामध्ये चौथ्या तिमाहीचे अहवाल सादर झाले असून ते काहीसे नकारात्मक राहिल्याचा परिणाम हा बजाज फायनान्स व फिनसर्व्ह यांचे समभाग प्रभावीत होण्यास कारणीभूत ठरले आहेत.

आज बाजार बंद

आज गुरुवारी भारतीय शेअर बाजार महाराष्ट्र दिन असल्याने बीएसई सेन्सेक्स् आणि एनएसई  निफ्टी यांचे कामकाज बंद राहणार आहेत.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज गुंतवणूकदारांचे लक्ष आर्थिक व्यवहार समिती आणि सुरक्षा समितीच्या बैठकीवर असेल. भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध काय पावले उचलते आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होतो यावर गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ााशिवाय, चौथ्या तिमाहीचे निकाल, प्राथमिक बाजारातील घडामोडी, भारत-अमेरिका व्यापार करार, निफ्टीची साप्ताहिक एफ अॅण्ड ओ समाप्ती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय समभागांची खरेदी हे देखील बुधवारी बाजारातील हालचाली निश्चित करतील.

जागतिक बाजारातील ट्रेंडवर एक नजर

बुधवारी सकाळी आशियाई बाजारांमध्ये संमिश्र वातावरण होते कारण गुंतवणूकदार अनेक प्रमुख आर्थिक डेटा आणि धोरणात्मक निर्णयांची वाट पाहत होते. यामध्ये चीनचा एप्रिलचा पीएमआय डेटा समाविष्ट आहे, जो दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. ऑस्ट्रेलियाचा महागाई डेटा आणि बँक ऑफ जपानच्या व्याजदर-निर्धारण बैठकीची सुरुवात राहिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article