महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाजारपेठेतील रस्ते अडकले अतिक्रमणांच्या विळख्यात

12:24 PM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुकानदार-विक्रेत्यांचे रस्त्यांवर ठाण : मुख्य बाजारपेठेतही स्टॉलधारकांचे अतिक्रमण : मनपाचे साफ दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर वाहतूक सुलभ होईल, असे वाटले होते. परंतु, खुल्या रस्त्यांवर फिरते विक्रेते, दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक करणे अवघड होत आहे. मुख्य बाजारपेठेतही स्टॉलधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण हटविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, कलमठ रोड, किर्लोस्कर रोड, काकतीवेस, खडेबाजार, समादेवी गल्ली, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, शहापूर खडेबाजार, वडगाव बाजार गल्ली व टिळकवाडीच्या काही भागात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. दुकानगाळ्यांच्या समोर पत्रे घालून रस्त्यावर व पदपथावर अतिक्रमण केले जात असल्याने नागरिकांना बाजारात ये-जा करणे अवघड होत आहे.

Advertisement

त्यातच काही ठिकाणी भाजीविक्रेते रस्त्यावरच भाजीविक्री करीत असल्यामुळे वाहने कोठून चालवायची? असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे. शहराचा विस्तार वाढत असल्याने खरेदीसाठी शहराच्या मुख्य भागात गर्दी वाढत आहे. गणपत गल्ली येथे तर दुकानांसमोर इतर छोट्या विक्रेत्यांना भाड्याने जागा देण्यात आली आहे. यामुळे हे विक्रेते रस्त्याला लागून साहित्याची विक्री करीत आहेत. यामुळे वाहने पार्किंगसाठी कोठे लावावीत? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर फिरत्या फळविक्रेत्यांमुळे तर वाहतूक कोंडी नेहमीचीच ठरली आहे. रस्त्यांवर अतिक्रमण होत असतानाही महानगरपालिकेकडून कुठेही कारवाई होताना दिसत नाही. केवळ कारवाईच्या नावाखाली एखाद्या स्टॉलधारकाला हटविले जाते. त्यानंतर ही कारवाई पुन्हा थांबविली जाते. अतिक्रमण हटवून रस्ते केव्हा मोकळे होणार, याची वाट नागरिकांना पहावी लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article