महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअरटेल, रिलायन्सच्या कामगिरीने बाजार सावरला

06:54 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 759  तर निफ्टी 216.95 अंकांनी मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स तर  एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारले आहेत. यामध्ये भारती एअरटेल  आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांमध्ये चमक राहिल्याने बाजार सावल्याचे दिसून आले. बाजाराला तेजीतून बळ देण्याची कामगिरी हेल्थकेअर आणि फार्मा या समभागांनी शुक्रवारी केले असून दुसऱ्या बाजूला रिलायन्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजी प्राप्त करण्यास महत्वाचे ठरले आहेत.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 759.05 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 0.96 टक्क्यांच्या मदतीने 79,802.79 वर बंद झाले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 216.95 अंकांनी भक्कम होत निर्देशांक 24,131.10 वर बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 27 समभाग तेजीसह बंद झाले. यामध्ये भारती एअरटेल, सनफार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अदानी पोर्ट आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग पहिल्या पाच मध्ये राहिले. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्लू स्टील, टायटन, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, एशियन पेन्ट्स, टाटा स्टील, टीसीएस, एनटीपीसी, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, आयटीसी, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले.

अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया आणि स्टेट बँक यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले. यामध्ये पॉवरग्रिड 1.23 टक्क्यांनी नुकसानीत तर नेस्ले व स्टेट बँक  हे 0.07 ते 0.05 टक्क्यांनी प्रभावीत झाले.

गुरुवारच्या सत्रात भारतीय बाजारात मोठी घसरण राहिली होती. ही घसरण जागतिक बाजारांमधील नकारात्मक कल व महिन्याच्या अखेरीसचा फ्यूचर्स अॅण्ड ऑप्शन्स यांच्या एक्स्पायरीचा दबाव यामुळेही बाजारात दबाव राहिल्याने घसरणीची नोंद झाली होती. मात्र अंतिम सत्रातील तेजीमुळे नवीन आठवड्यात बाजार कोणती दिशा निश्चित करणार हे पहावे लागणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article