नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला ८५० कोटींची नोटीस
पत्नीच्या कॅन्सरच्या उपचांवरील भाष्य भोवली
पंजाब
पंजाब कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी नवज्योत कौर सिद्धू (नोनी) यांच्या कॅन्सरच्या उपचारावर भाष्य केले होते. त्यांनतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना छत्तीसगड सिव्हील सोसायटीने ८५० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी यांना स्टेज ४ कॅन्सर झाला होता. दिड वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाशी त्यांची झुंज चालू होती. त्यांच्या या लढाईत नवज्योत सिंग सिद्धू आणि त्याच्या कुटुंबियांची मोलाची साथ लाभली. त्यांच्या या प्रवासाबद्दल बोलताना नवज्योत सिंग म्हणाले, डॉक्टरांनी माझ्या पत्नीची कॅन्सर वाचण्याची ५ टक्के सुद्धा शक्यता वर्तविली न्हवती. अशा वेळी आम्ही नैराश्यात न जाता आयुर्वादातील डाएट फॉलो केला. यानंतर ४० दिवसात माझ्या पत्नीने कॅन्सरवर मात केली. आणि आता ती कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झाली आहे.
यावेळी ते म्हणाले, पत्नी सोबत मी सुद्ध हे डाएट फॉलो करतो, त्यामुळए मी फॅटी लिव्हर वर मात केली आहे. आम्हाला कडुलिंबाची पाने, कच्ची हळद, लिंबू आणि अॅपल साईडर व्हिनेगरची मदत झाली. त्यांनी हा दावा अमृतसर मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्नीला अॅलोपॅथी मधून उपचार न देता फक्त आयुर्वेदाच्या डाएटने मदत केली. आणि ४० दिवसात कॅन्सरवर मात केली. या वक्तव्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांचा गोंधळ उडतो आहे. त्यांच्या अॅलोपॅथीच्या औषधावरील विश्वास उडत चालला आहे. नवज्योत सिंग यांच्या या वक्तव्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांची दिशाभूल केली जात आहे. तरी सिद्धू यांनी आमच्याकडे उपचारासंबंधीची सर्व कागदपत्रे सादर करावीत नाहीतर माफी मागावी. अन्यथआ ८५० कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा केला जाईल अशी नोटीस छत्तीसगड सिव्हील सोसायटीने नवज्योत सिंग सिद्धू यांना पाठवली आहे.