For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दैनंदिन तोट्यातून बाजार सावरला

06:11 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
दैनंदिन तोट्यातून बाजार सावरला
Advertisement

आशियातील घसरणीचा परिणाम : सेन्सेक्स 50.62 तर निफ्टी 18.95 अंकांनी नुकसानीत

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक काहीशा घसरणीसोबत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवर आशियाई बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत समभाग दैनंदिन तोट्यातून काहीसे सावरले. ट्रेडिंगच्या शेवटच्या दोन तासांमध्ये तोटा कमी होण्यापूर्वी सत्रादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 0.8 टक्क्यांच्या आसपास घसरुन बंद झाले आहेत.

Advertisement

. विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. अमेरिकी बाजारातील कमजोरीमुळे देशांतर्गत बाजारांवरही दबाव राहिला होता. बीएसईचा सेन्सेक्स बुधवारी सकाळी 78,319 वर खुला झाला आहे. मात्र नंतर काही मिनिटांतच तो घसरला. ट्रेडिंगदरम्यान  700 हून अधिक अंकांनी घसरले होते.

अंतिमक्षणी मात्र बीएसई  सेन्सेक्स 50.62 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.06 टक्क्यांसह 78,148.49 वर बंद झाला. दुसऱ्याबाजुला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 देखील सकारात्मक खुला झाला होता. मात्र शेवटी, निफ्टी 18.95 अंकांच्या किंचित घसरणीसह 23,688.95 वर जवळजवळ स्थिर झाला.

रिलायन्स-टीसीएसने मोठ्या घसरणीतून वाचवले

देशांतर्गत कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनी गुंतवणूकदारांच्यात घबराट निर्माण केली आहे. कंपनीच्या तिमाही निकालांची मालिका 9 जानेवारीला टीसीएसच्या निकालांनी सुरू होणार आहे. मंगळवारी अमेरिकन शेअरबाजार घसरणीसह बंद झाले. याचा परिणाम आशियाई बाजारांसह देशांतर्गत बाजारावर झाला.

डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप आणि नोव्हेंबरमध्ये नवीन नोक्रयांमध्ये वाढ दर्शविणारा डेटा रिलीझ झाल्यानंतर वॉल स्ट्रीटमध्ये घट झाली. हे आकडे सूचित करतात की यूएस अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे.तथापि, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी दिग्गज टीसीएस आणि आयटीसी यांच्या समभागांमधील नफ्यामुळे निर्देशांकात मोठे वजन राहिले आहे, त्यामुळे बाजाराला दिवसभरात मोठी घसरण झाली. मात्र अंतिमक्षणी सावरत बाजार काहीशा घसरणीसोबत बंद झाला.

डाबर इंडिया आणि हिरो मोटोकॉर्पसह इतर कंपन्यांच्या अलीकडील तिसऱ्या तिमाहीतील व्यवसाय अद्यतने विश्लेषकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तिस्रया तिमाहीतील कॉर्पोरेट निकाल मागील (दुसऱ्या) तिमाहीपेक्षा चांगले नसतील अशी भीती गुंतवणूकदारांना वाटते.

तज्ञांचे म्हणणे आहे की, कॉर्पोरेट कमाई आणि महागडे मूल्यमापन कमी झाल्याची चिंता देशांतर्गत बाजारावर आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याची भीती यासारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे.

Advertisement
Tags :

.