‘आयटी, धातू’ने बाजार सावरला
सेन्सेक्स 398 तर निफ्टी 135.65 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय बाजारात घसरणीनंतर, गुरुवारी शेअर बाजार पुन्हा तेजीत आला. मध्य पूर्वेतील शांतता आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या परतीच्या आशेमुळे आयटी, धातू आणि औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने शेअर बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 398.44 अंकांनी किंवा 0.49 टक्क्यांनी वाढून 82,172.10 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135.65 अंकांनी वाढून 25,181.80 अंकांनी बंद झाला. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.97 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.61 टक्क्यांनी वाढला.
निर्देशांकाच्या तुलनेत, मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांची कामगिरी संमिश्र स्थितीत राहिली होती. यावेळी बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वाढला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.18 टक्क्यांनी घसरला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारले. निफ्टी आयटी, धातू आणि औषधनिर्माण क्षेत्रातील समभाग एक टक्क्यांहून अधिक वधारले. ऑटो, बँक, ऊर्जा, वित्तीय सेवा, रिअल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येही वाढ दिसून आली. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि सन फार्मा सर्वाधिक वधारले. दुसरीकडे अॅक्सिस बँक, टायटन, एचडीएफसी बँक, मारुती आणि भारती एअरटेल सर्वाधिक घसरले.
परदेशी बाजारांची स्थिती
शेअर बाजारातील आकडेवारी-नुसार, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 81.28 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. आशियातील इतरत्र, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कंपोझिट लक्षणीय वाढला तर हाँगकाँगचा हँग सेंग घसरला. प्रमुख युरोपीय बाजार संमिश्र राहिले. बुधवारी अमेरिकन बाजार वधारले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.23 टक्केने घसरून 66.08 प्रति बॅरलवर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्स 153.09 अंकांनी घसरला तर एनएसईचा निफ्टी 62.15 अंकांनी घसरला.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टाटा स्टील 176
- एचसीएल टेक 1485
- अल्ट्राटेक सिमेंट 12192
- सनफार्मा 1658
- भारत इलेक्ट 409
- कोटक महिंद्रा 2139
- टीसीएस 3061
- इटरनल 345
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3769
- ट्रेन्ट 4665
- इन्फोसिस 1509
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1377
- एनटीपीसी 336
- हिंदुस्थान युनि 2517
- टेक महिंद्रा 1466
- महिंद्रा-महिंद्रा 3443
- स्टेट बँक 862
- आयसीआयसीआय 1376
- एशियन पेन्ट्स 2340
- पॉवरग्रिड कॉर्प 286
- अदानी पोर्ट 1396
- बजाज फायनान्स 1024
- आयटीसी 399
- बजाज फिनसर्व्ह 2014
- ल्यूपिन 1957
- वेदान्ता 484
- सिप्ला 1514
- मॅक्स हेल्थकेअर 1152
- जिओ फायनान्स 307
- ब्रिटानिया 5872
- श्री सिमेंट 29486
- टीव्हीएस मोटार 3489
- कॅनरा बँक 126
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अॅक्सिस बँक 1169
- मारुती सुझुकी 15976
- टायटन 3550
- टाटा मोटर्स 680
- एचडीएफसी बँक 977
- भारती एअरटेल 1941
- बीपीसीएल 344
- कोलगेट 2208