कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्धाच्या सावटाखाली बाजारात दबाव

06:42 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 511 अंकांनी घसरला : आयटी समभाग दबावात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

इराण व इस्रायल यांच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिसून आला. सेन्सेक्स 511 अंकांनी तर निफ्टी 140 अंकांनी घसरलेला होता. आयटी निर्देशांकाने घसरण अनुभवली होती.

सोमवारी सरतेशेवटी 30 समभागांचा सेन्सेक्स 511 अंकांनी कमकुवत होत 81896 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 140 अंकांनी घसरत 24971च्या स्तरावर बंद झाला. शेअरबाजारात दिवसभरातील कामगिरीचा आढावा घेतल्यास विविध निर्देशांकात आयटी निर्देशांक कमकुवत दिसून आला. अॅक्सेंचर या कंपनीने शुक्रवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्याचे परिणाम सोमवारी शेअरबाजारात दिसून आले. आयटी निर्देशांक 577 अंकांनी घसरत 38414 च्या स्तरावर बंद झाला. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्या समभागांमध्ये 3 टक्क्यापर्यंत घसरण दिसून आली. एचसीएल टेक, ओरॅकल फायनॅन्शीयल यांचेही समभाग 1 ते 2 टक्के घसरणीत राहिले होते. मागच्या तिमाहीत महसुलात अॅक्सेंचरने 7 टक्के वाढ नोंदवली आहे. पण संपूर्ण वर्षात महसुलात कमतरता राहिली असल्याचे समजते. यासोबत इतर क्षेत्रांच्या निर्देशांकात पाहता मीडिया, धातु, ऑइल व गॅस, फार्मा यांची कामगिरी तेजीसोबत राहिली. मिडकॅप 100 निर्देशांक व स्मॉलकॅप100 निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात तेजीसोबत बंद झाले.

ऑटो कंपन्यांचे समभाग घसरणीत होते. निफ्टीत इन्फोसिस, एचसीएल टेक, आयटीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प, एचयुएल, आयटीसी, टीसीएस, पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग घसरणीत होते. तर बँकांच्या निर्देशांकात पाहता एसबीआय, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, फेडरल बँक यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले होते. रुपया डॉलरच्या तुलनेत 16 पैसे कमकुवत होत 86.75 च्या स्तरावर बंद झाला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#tarunbharatnews
Next Article