कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चढ-उतारांमध्ये बाजार पुन्हा घसरणीत

06:50 AM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 28 तर निफ्टी 12 अंकांनी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी जागतिक बाजारपेठेतील संमिश्र स्थिती राहिल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी देशातील ऑटो आणि फार्मा आयातीवर 25क्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर फार्मा आणि आयटी समभागांमध्ये घसरण राहिली आहे.

यामुळे, हेवी वेटेड फायनान्शियल स्टॉकमध्ये झालेल्या वाढीचा फायदा बाजाराला मिळू शकला नाही. ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर चिप्सवर 25 टक्के कर देखील जाहीर केला आहे. त्यांनी सांगितले की, 2 एप्रिलपासून नवीन टॅरिफ लागू केले जाणार असल्याचे संकेत आहेत.  बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 75,787 अंकांवर उघडला. परंतु दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 28.21 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.04 टक्क्यांनी घसरून 75,939.18 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारातील एनएसई  निफ्टी देखील दिवसअखेर 12.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.05 टक्क्यांसह 22,932.90 वर बंद झाला आहे.

आयटी समभागांवर बुधवारी काहीसा दबाव राहिला होता. यामध्ये टीसीएसचे समभाग 2.28 टक्क्यांवर सर्वाधिक घसरणीसह बंद झाले. याशिवाय, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, भारती एअरटेल, पॉवरग्रिड, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग घसरणीत होते. स्मॉलकॅप आणि मिडकॅप 2.4 टक्के आणि 1.6 टक्केने वाढले. तथापि, निर्देशांक अजूनही सप्टेंबर आणि डिसेंबरमधील त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा अनुक्रमे 21.25 टक्के आणि 17.1 टक्क्यांच्या खाली व्यवहार करत राहिला.

उच्च पातळीवर नफा घेण्यामधील एका दिवसाच्या अंतरानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी झपाट्याने घसरून बंद झाले. मात्र बुधवारी चढउताराची स्थिती राहिल्याचे दिसून आले. यामुळे गुरुवारच्या बाजारात काय स्थिती राहणार हे जागतिक बाजारांमधील घडामोडींवर अवलंबून राहणार असल्याचे स्पष्टीकरण शेअर बाजार अभ्यासकांनी यावेळी दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article