5 कंपन्यांचे बाजार भांडवल 1.99 लाख कोटींनी वाढले
नवी दिल्ली:
मागच्या आठवड्यात बाजार भांडवलात 1.99 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. देशातील आघाडीवरच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य वाढले आहे. यात दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बाजार भांडवलात 90,220 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 18.54 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. याशिवाय टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यात वाढल्याचे दिसले आहे. तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एलआयसी, आयटीसी आणि एसबीआय यांचे एकत्रित बाजार भांडवल 76,099 कोटी रुपयांनी घसरले आहे. एचडीएफसी बँक ही 32,610 कोटी रुपयांच्या घसरणीसह सर्वाधिक नुकसानीत राहिली आहे. सध्याला बँकेचे बाजार भांडवल मूल्य 12.45 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. शुक्रवारी शेअरबाजाराने विक्रमी स्तरावर झेप घेतली होती. सेन्सेक्स 847 अंकांनी तर 247 अंक वाढीसह निफ्टी बंद झाला होता.