कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक संमिश्र स्थितीचा बाजाराला लाभ

06:59 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 70 अंकांनी वधारला : रिलायन्सचे समभाग वधारला

Advertisement

मुंबई :

Advertisement

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी जागतिक बाजारातील संमिश्र स्थितींमुळे देशांतर्गत शेअर बाजारांनी सलग तिसऱ्या व्यापार सत्रात तेजीची नेंद केली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग हे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वाढीने बाजार तेजीत ठेवण्यात महत्त्वाच्या भूमिकेत राहिला आहे. बीएसई सेन्सेक्स 100 अंकांपेक्षा जास्त वाढून 80,396.92 वर सकाळी उघडला. अंतिम सत्रात मात्र सेन्सेक्स 70.01 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.09 टक्क्यांसह 80,288.38 वर बंद झाला. तसेच, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टीने देखील सकारात्मक सुरुवात केली. अंतिम क्षणी निफ्टी 7.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 24,335.95 वर बंद झाला.

सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिले. जवळपास समभाग 2.3 टक्क्यांनी वाढून 1,399 वर बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, एटरनल (पूर्वी झोमॅटो), एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि टीसीएस हे इतर प्रमुख वधारणारे होते.

दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट आणि सनफार्मा 2 टक्क्यांनी घसरले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, एसबीआय आणि नेस्ले इंडिया देखील मोठ्या प्रमाणात तोट्यात राहिले होते.

जागतिक बाजारांकडून कोणते संकेत मिळतात?

वॉलस्ट्रीट निर्देशांकांनी अस्थिर सत्राचा शेवट सकारात्मक पातळीवर केला. एस अँड पी 500 0.06 टक्क्यांनी वाढून 5,528.75 वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिट 0.1 टक्क्यांनी घसरून 17,366.13 वर बंद झाला. डाऊजोन्स 0.28 टक्क्यांनी वाढून 40,227.59 वर बंद झाला. एस अँड पी 500 शी जोडलेले फ्युचर्स 0.08 टक्क्यांनी वधारले. तर नॅस्डॅक 100 फ्युचर्स 0.11 टक्क्यांनी आणि डाऊ जोन्स फ्युचर्स 0.05 टक्क्यांनी वधारले.

आशियाई बाजारपेठांमध्ये आज वाढ दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 0.56 टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.27 टक्क्यांनी वधारला. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे जपानी बाजारपेठा बंद आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article