महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा येथील मार्कंडेय नदीकाठचा भाग स्वच्छ : नागरिकांतून समाधान

10:48 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंडलगा : हिंडलगा ग्रामपंचायततर्फे यावर्षी अनंत चतुर्दशीला नदीकाठावर ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था करून स्वच्छतेविषयी जागृतीफलक लावण्यात आला होता. तसेच सर्व गणेशभक्तांना स्वच्छतेविषयी आवाहन केले होते. निर्माल्य, प्लास्टिक व इतर साहित्य इतरत्र न टाकता ट्रॉलीमध्ये टाका व परिसर स्वच्छ ठेवा, अशाप्रकारचे आवाहन गणेशभक्तांना केले होते. तरीदेखील या ठिकाणच्या गर्दीत कांही गणेशभक्तांनी निर्माल्य, प्लास्टिक व इतर साहित्य परिसरात फेकून दिले होते. त्यामुळे येथील परिसर अस्वच्छ झाला होता. याची दखल ग्रामपंचायत अध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर, प्रवीण पाटील, यल्लाप्पा गुंडू काकतकर, गजानन बांदेकर, उमा सोनवडेकर यांनी घेऊन लागलीच तो परिसर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. या परिसरातील सर्व प्लास्टिक, निर्माल्य व इतर सर्व टाकलेल्या वस्तू एकत्र करून याची उचल केली व भाविकांना हा परिसर स्वच्छ करून दिला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामपंचायततर्फे समस्त नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, याची समस्त भाविकांनी व नागरिकांनी दखल घ्यावी. पाण्यात टाकाऊ वस्तु, पूजा साहित्य, प्लास्टिक अशा वस्तू टाकू नयेत, असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article