11.67 कोटींचा गांजा जप्त
गोवा क्राईम ब्रांचकडून कारवाई : ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश: गिरी-म्हापसा येथे आरोपीला अटक
प्रतिनिधी/ म्हापसा
गोवा क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत 11.672 किलो हायड्रोफोनिक गांजासह एका तऊणाला अटक केली आहे, ज्याची किंमत 11.67 कोटी आहे. गोव्यातील इतिहासात एवढ्या मोठ्या रकमेचा गांजा जप्त करणे, ही सर्वांत मोठी घटना मानली जात आहे. आरोपीला गिरी, म्हापसा येथे अटक करण्यात आली. ही अटक सखोल तपासाअंती आणि एक महिन्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारावर करण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य पोलिसांचे याबाबत अभिनंदन केले असून, गोवा राज्य झिरो अमलीपदार्थ टॉलरेन्स करण्यास यशस्वी होईल, असे म्हटले आहे. आरोपीविऊद्ध नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सब्स्टन्सेस अधिनियमाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
अमृतसरमध्येही तस्करीचा पर्दाफाश
दरम्यान, सीमा सुरक्षा दल (ँएइ) आणि नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (ऱ्ण्ँ) यांनी अमृतसर सीमेजवळ एक संयुक्त ऑपरेशन राबवले, ज्यात दोन ड्रग तस्करांना पकडण्यात आले. ही कारवाई गुप्तचर विभागाच्या माहितीवर आधारित होती. अधिकाऱ्यांनी दोन संशयित व्यक्तींना मोटरसायकलवरून जात असताना पाहिले आणि त्यानंतर एक सापळा रचला. थोड्या पाठलागानंतर, एक तस्कर पकडला गेला, तर दुसऱ्या तस्कराला पळून जाण्यास यश आले. पकडलेल्या तस्कराकडून 506 ग्रॅम हेरॉइन, एक स्मार्टफोन, तीन एटीएम कार्ड्स आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. हेरॉइनचे पॅकेट पिवळ्या रंगाच्या अॅडहेसिव्ह टेपने लपवले होते आणि त्यात एक स्टील खिळ्याने जोडले होते, ज्यामुळे असे दिसते की हा ड्रग्स पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेला असल्याची शक्यता आहे. पकडलेल्या तस्कराची ओळख अमृतसरमधील सैदपूर गावातील रहिवासी म्हणून झाली आहे. ही कारवाई जसरोर गावाजवळ, भिंडी सैदन पोलिस स्टेशनच्या अंतर्गत करण्यात आली. नंतर, दुसऱ्या तस्कराला अवान बासू गावात पकडण्यात आले. दोन्ही तस्कर पोलिसांच्या ताब्यात आहेत व त्यांच्या पाकिस्तान आधारित नार्को-स्मगलिंग नेटवर्कशी संबंधित कनेक्शन तपासण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.