For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारिहाळ पोलिसांनी आवळल्या दोघा मोटारसायकल चोरांच्या मुसक्या

11:52 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मारिहाळ पोलिसांनी आवळल्या दोघा मोटारसायकल चोरांच्या मुसक्या
Advertisement

सव्वातीन लाखाच्या दहा मोटारसायकली जप्त

Advertisement

बेळगाव : दोघा अट्टल दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याजवळून 3 लाख 20 हजार रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मारिहाळ पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची कसून चौकशी करण्यात येत आहे. मोहसीन अब्दुलमजीद जमादार (वय 34) रा. पंतबाळेकुंद्री, शब्बीर अब्दुलगणी कोळ्ळूर (वय 36) रा. आझमनगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या जोडगोळीने मार्केट, माळमारुती, एपीएमसी, खडेबाजार पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनँग, उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली.

बुधवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी मारिहाळ पोलीस स्थानकात मोटारसायकल चोरीसंबंधी एफआयआर दाखल झाला होता. 18 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12.30 यावेळेत सुळेभावी येथील जागृत महालक्ष्मी मंदिराजवळ उभी करण्यात आलेली केए 22 क्यू 3653 क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेली होती. यासंबंधी एफआयआर दाखल झाल्यानंतर गुन्हेगारांचा तपास करताना खनगावजवळ बेळगाव-गोकाक रोडवर नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून संशयित आरोपी येत होते. पोलिसांना पाहून त्यांनी आपली मोटारसायकल वळवली. पाठलाग करून मोहसीन व शब्बीर यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघा जणांची चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.