कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मारिया मचाडो यांना शांततेचे ‘नोबेल’

07:00 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्यांचा सन्मान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हुकली संधी

Advertisement

वृत्तसंस्था/स्टॉकहोम

Advertisement

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना वर्ष 2025 चा शांतता नोबेल महापुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या पुरस्कारासाठी आग्रही होते. तथापि, त्यांना हा पुरस्कार यावेळी देण्यात आलेला नाही. मचाडो यांनी व्हेनेझुएलात लोकशाहीच्या स्थापनेसाठी जे कार्य केले आहे, त्याची नोंद घेत हा पुरस्कार त्यांना देण्याची घोषणा केली गेली. यंदाचा शांतता नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रही भूमिकेमुळे प्रकाशझोतात होता. तो नेमका कोणाला मिळणार, याविषयी साऱ्या जगात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आपण जगातील 8 युद्धे थांबवून हजारो सर्वसामान्यांचे प्राण वाचविल्यामुळे आपण या पुरस्कारासाठी पात्र आहोत, असे ट्रम्प यांचे प्रतिपादन होते. त्यांना इस्रायल आणि पाकिस्तानने पाठिंबाही दिला होता. तथापि, नोबेल पुरस्कार समितीने यावेळी ट्रम्प यांचा विचार केला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मारिया मचाडो यांची निवड

नोबेल पुरस्कार समितीने यंदाच्या शांतता पुरस्कारासाठी व्हेनेझुएला या देशाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी निवड केली आहे. त्या व्हेनेझुएलाच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून परिचित आहेत. व्हेनेझुएलात खरीखुरी लोकशाही स्थापन व्हावी, यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मोठा संघर्ष केला आहे. त्या सध्या 58 वर्षांच्या आहेत. जगप्रसिद्ध ‘टाईम’ नियतकालिकाने 2025 मध्ये त्यांचा समावेश ‘शंभर सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्वां’मध्ये केला आहे.

मचाडो या ट्रम्पसमर्थकच

डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह अव्हेरुन मचाडो यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली असली, तरी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांना फारसे वाईट वाटणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. कारण एकप्रकारे मचाडो या टॅम्प समर्थकच आहेत. व्हेनेझुएलाचे सध्याचे सत्ताधीश निकोलास मादुरो हे ट्रम्पविरोधक म्हणून ओळखले जातात. व्हेनेझुएलातून अमेरिकेत मादक पदार्थांची बेकायदेशीर आयात होते. ट्रम्प यांनी यासाठी मादुरो यांना उत्तरदायी मानले असून व्हेनेझुएलावर कठोर आर्थिक निर्बंध घातले आहेत. इतकेच नव्हे, तर मादुरो यांना पकडून देणाऱ्यास घोषित करण्यात आलेल्या पुरस्काराची रक्कम ट्रम्प यांनी दुप्पट केली असून ती आता 5 कोटी डॉलर्स इतकी आहे. याचाच अर्थ ट्रम्प यांना मादुरो हे सत्तेवर नको आहेत, असा घेतला जात आहे. मादुरो यांच्या विरोधातील पुरस्काराची रक्कम ट्रम्प यांनी दुप्पट केल्यानंतर मारिया मचाडो यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले होते. तसेच मादुरो यांना ट्रम्प जो विरोध करीत आहेत, त्याचे त्या समर्थन करतात. मादुरो हे लोकशाहीविरोधी नेते आहेत, ही मचाडो यांची भूमिका आहे. म्हणजेच एका अर्थाने त्या ट्रम्प समर्थकच आहेत. ट्रम्प यांचा विचार या पुरस्कारासाठी यंदा झालेला नसला, तरी त्यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या मचाडो यांची निवड करुन ट्रम्प समर्थकांच्या नाराजीवर फुंकर घातली आहे, अशी चर्चा आहे.

मारिया मचाडो कोण आहेत...

सध्या 58 वर्षांच्या असणाऱ्या मारिया कोरिना मचाडो या ‘औद्योगिक अभियांत्रिकी’च्या (इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग) पदवीधर आहेत. त्यांनी गेली तीन दशके व्हेनेझुएलात लोकशाहीची स्थापना व्हावी, यासाठी संघर्ष केला आहे. सध्या  त्या ‘व्हेंटे व्हेनेझुएला’ या उदारमतवादी राजकीय पक्षाच्या मुख्य समन्वयक आहेत. 2013 मध्ये त्यांनीच अन्य नेत्यांसह या पक्षाची स्थापना केली आहे. 2010 ते 2015 या काळात त्या व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्य होत्या. या देशातील एकाधिकारशाही संपुष्टात येऊन तेथे लोकशाहीची स्थापना व्हावी आणि लोकांना त्यांच्या इच्छेनुसार सरकार स्थापना करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष गेली तीस वर्षे नेटाने चालविला आहे, अशी माहिती आहे.

ट्रम्प यांची संधी का हुकली...

शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकण्याचे सर्वात मोठे कारण असे आहे, की यंदाच्या पुरस्कारासाठी नावांची सूची 31 जानेवारीलाच बंद करण्यात आली होती. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे 20 जानेवारीला स्वीकारली होती. त्यामुळे यंदा त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नव्हती. त्यांनी 8 युद्धे थांबविल्याचे जे प्रतिपादन केले आहे, त्याचा विचार आता पुढच्या वर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी केला जाऊ शकतो, असे स्वत: नोबेल पुरस्कार समितीनेच स्पष्ट केले आहे. तसेच या पुरस्कारांसाठी निवड करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कोणीही कितीही अभियाने चालविली, तरी निवड, ही पद्धत आणि या पुरस्कारांचे निर्माते अल्फ्रेड नोबेल यांनी निर्धारित केलेलाr मार्गदर्शक तत्वे, यांच्यावरच आधारित असते, असेही समितीने पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना पुढे संधी मिळू शकते.

अमेरिकेची नाराजीयुक्त प्रतिक्रिया

नोबेल पुरस्कारासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड न झाल्याने त्यांच्या प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पुरस्कारासाठी शांततेसाठी केलेल्या कार्याचा नव्हे, तर राजकारणाचा विचार करण्यात आला. तरीही  ट्रम्प शांततेसाठी प्रयत्न करीत राहतील, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या प्रशासनाने व्यक्त केली आहे.

लोकशाहीसाठी कार्याचा गौरव

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article