For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात मागणी घटल्याने एफएमसीजी कंपन्यांचे मार्जिन कमी

06:22 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात मागणी घटल्याने एफएमसीजी कंपन्यांचे मार्जिन कमी
Advertisement

किंमती वाढण्याचे संकेत : उच्च उत्पादन खर्च आणि अन्नधान्य महागाईचा परिणाम

Advertisement

नवी दिल्ली :

उच्च उत्पादन खर्च आणि अन्नधान्य महागाईमुळे सप्टेंबर तिमाहीत देशातील प्रमुख एफएमसीजी कंपन्यांचे मार्जिन घसरले. पामतेल, कॉफी आणि कोको यांसारख्या एफएमसीजी कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आता काही एफएमसीजी कंपन्यांनी किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, मॅरिको, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांनी शहरी भागात वस्तुंच्या वापरात घट झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement

उद्योग तज्ञांच्या मते, एफएमसीजी क्षेत्राच्या एकूण विक्रीत शहरी वापराचा वाटा 65-68 टक्के आहे. जीसीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना सांगितले की, आम्हाला वाटते की हा अल्पकालीन धक्का आहे आणि आम्ही विवेकपूर्ण मूल्यवर्धन आणि खर्च स्थिरीकरणाद्वारे मार्जिन वसूल करू.

सिंथॉल, गोदरेज नंबर-वन, हिट यासारख्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या जीसीपीएलने तेलाच्या किमतीत चढ-उतार आणि ग्राहकांची मागणी कमी असतानाही भारतात तिमाहीत स्थिरता राखली आहे. उल्लेखनीय म्हणजे, पूर्वी मागे पडलेल्या ग्रामीण बाजारपेठेने शहरी बाजाराच्या तुलनेत आपला वाढीचा दर कायम ठेवला आहे. आणखी एक एफएमसीजी कंपनी, डाबर इंडियाने असेही म्हटले आहे की सप्टेंबर तिमाहीतील मागणीचे वातावरण आव्हानात्मक होते, त्यात उच्च अन्न महागाई आणि कमी शहरी मागणी यांचा समावेश आहे.

डाबर च्यवनप्राश, पुदिन हारा आणि रियल ज्यूसच्या निर्मात्याने या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 17.65 टक्क्यांनी घट नोंदवली असून ती 417.52 कोटी रुपये आहे. दरम्यान, कंपनीचे परिचालन उत्पन्न 5.46 टक्क्यांनी घसरून 3,028.59 कोटी रुपये झाले आहे.

अलीकडे, नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनीही इश्ण्उ क्षेत्रातील घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ‘मध्यम विभाग‘ दबावाखाली असल्याचे सांगितले कारण उच्च अन्न महागाईने देशांतर्गत बजेटवर परिणाम केला आहे. अन्नधान्याच्या महागाईच्या वाढीबाबत नारायणन म्हणाले की, फळे, भाज्या आणि तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ते म्हणाले, ‘कंपन्यांना कच्च्या मालाची किंमत व्यवस्थापित करणे कठीण झाले तर यामुळे किंमती वाढू शकतात.

Advertisement
Tags :

.