माझगाव डॉकचा नफा 76 टक्क्यांनी वधारला
वाढीसह नफा 585 कोटींवर : महसूल 51 टक्क्यांनी वाढला
मुंबई :
सरकारी मालकीची जहाजबांधणी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 76 टक्के वार्षिक वाढीसह 585 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागच्या वर्षीच्या याच तिमाहीत निव्वळ नफा 333 कोटी रुपयांचा होता. याच तिमाहीत पाहता माझगाव डॉकचा महसूल 2,757 कोटी रुपयांवर पोहचला आहे. महसुलात वार्षिक आधारावर 51 टक्के वाढ झाली आहे.
माझगाव डॉक समभागांचा 117 टक्के परतावा
निकालानंतर, कंपनीचे शेअर्स 4.53 टक्क्यांनी वाढून 4,209 रुपयांवर व्यापार करत आहेत. एका वर्षात माझगाव डॉकच्या समभागाने 117 टक्क्यांनी परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचा समभाग 86.58 टक्क्यांनी वर चढला आहे.
कंपनीचे मार्केट कॅप 84.99 हजार कोटी रुपये आहे. कंपनीने 1774 मध्ये ड्राय डॉक बांधून सुरुवात केली. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे.