महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किरकोळ महागाई दर 4.87 टक्क्यांवर

06:34 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सणासुदीच्या काळात महागाईपासून दिलासा मिळाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून किरकोळ चलनवाढीचा दर घसरत आहे. अन्नधान्याच्या किमती घसरल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली असून ती चार महिन्यांतील नीचांकी 4.87 टक्क्मयांवर पोहोचली आहे.

घसरलेल्या दरामुळे सणासुदीमध्ये देशवासियांना सुखद धक्का मिळाला आहे. सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्मयांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता. आता ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर जाहीर करण्यात आला असून तो 5 टक्क्यांच्या खाली पोहोचला आहे. गेल्या महिन्यात 6.62 टक्के असलेला अन्नधान्य महागाई दर आता 6.61 टक्के झाल्याने किंचित घसरण झालेली दिसून आली. तर गेल्या वषी म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7.01 टक्के आणि अन्नधान्य महागाई दर 6.71 टक्के होता.

यापूर्वी जूनमध्ये महागाईचा दर 4.87 टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किरकोळ महागाई 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. 2022-23 मधील 6.7 टक्क्मयांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. किरकोळ महागाई दर चार टक्क्यांपर्यंत ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयला दिली आहे. द्वैमासिक चलनविषयक धोरणाचा विचार करताना मध्यवर्ती बँक प्रामुख्याने किरकोळ महागाईकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article