मडगाव नगरी बनली ‘कार्निव्हलमय’
12:26 PM Mar 03, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
मिरवणुकीला प्रारंभ करतेवेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व उपनगराध्यक्षा बबिता नाईक, कार्निव्हल समितीचे अध्यक्ष नगरसेवक कामिलो बार्रेटो आणि सरचिटणीस सँड्रा फर्नाडिस, खजिनदार मिलाग्रिना गोम्स तसेच इतर नगरसेवक यावेळी उपस्थित होते. या मिरवणुकीमध्ये केवळ पारंपरिक कलांच्या चित्ररथांना समाविष्ट करण्यात येणार असून राजकीय संकल्पना असलेल्या पथकांना सक्त मनाई करण्यात येणार असल्याचे कार्निव्हल समितीकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे यात पारंपरिक व्यवसाय व कलांवरील चित्ररथ तसेच पुरस्कृत गटातील चित्ररथ आणि जंक कार आदींचा समावेश राहिला. पारंपरिक मच्छीमार, रेंदेर यांच्यावरील चित्ररथ तसेच डायनोसॉरची भव्य प्रतिकृती लक्ष वेधून गेली. फोर्सा गोवाचे पथकही सहभागी झाले होते. याशिवाय विविध प्रकारची सोंगे, पाश्चात्य संगीतावर पदन्यास करणाऱ्या युवक-युवती हेही या मिरवणुकीचे आकर्षण राहिले. सुमारे 100 पथकांचा यात समावेश राहिला. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि सुरळीतपणे मिरवणूक होण्यासाठी यावेळी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस तसेच पोलीस देखरेख ठेवून होते.
Advertisement
पारंपरिक गटातील चित्ररथ, नृत्य पथकांनी वाढविली मिरवणुकीची रंगत, लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद
Advertisement
मडगाव : मडगावात कार्निव्हल मिरवणूक रविवारी लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगून संपूर्ण शहर कार्निव्हलमय बनले असल्याचे दिसून आले. रात्री 8 पर्यंत ही मिरवणूक चालू होती. विविध पथकांची नृत्ये, गोव्यातील पारंपरिक व्यवसाय व कला दाखवून देणारे चित्ररथ यामुळे ही मिरवणूक रंगतदार झाली. होली स्पिरीट जंक्शन ते मडगाव नगरपालिका चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली आणि लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून त्याचा आनंद घेतला. यात देशी-विदेशी पर्यटकांचीही उपस्थितीही लक्षणीय होती. सासष्टीच्या विविध भागांतील लोकांनी यावेळी उपस्थिती लावली होती. किंग मोमोने आपली राजवट लागू झाल्याचे घोषित केल्यानंतर आलेल्या एकेक पथकाला उत्स्फूर्त दाद मिळाली.
Advertisement
Advertisement
Next Article