महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करवाढीविरोधात पिरनवाडी नगरपंचायतीवर मोर्चा

10:41 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संगणक उताऱ्याला घेताहेत भरमसाट रक्कम : सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक : नोडल अधिकाऱ्यांना नागरिकांनी धरले धारेवर : सभा घेऊन माहिती देण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत नगरपंचायत होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटला. नगरपंचायतीमुळे गावचा विकास होणार अशी नागरिकांना आशा होती. परंतु विकास तर सोडाच उलट अधिक करवाढ करून नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. तसेच संगणक उताऱ्यासाठी नगरपंचायतींकडून भरमसाट रक्कम घेण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पिरनवाडी भागातील नागरिकांनी बुधवारी सकाळी नगरपंचायतीवर मोर्चा काढला. विविध प्रकारची करवाढ केली आहे. संगणक उताऱ्यासाठी भरमसाट रक्कम घेण्यात येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडून सर्वसामान्य लोकांची लूट करण्यात येऊ लागली आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. संगणक उताऱ्यासाठी भरमसाट रक्कम सामान्य जनता देणार कुठून? असा सवालही उपस्थित नागरिकांनी नोडल अधिकाऱ्यांना विचारला आणि त्यांना चांगलेच धारेवर धरले. नगरपंचायतमधील अधिकाऱ्यांना अनेकवेळा सांगूनही सरकारी नियमानुसार संगणक उतारा देण्यात येत नाही आणि ज्यांना हवा असेल त्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले आहेत.  नगरपंचायतीमध्ये असा प्रकार का सुरू आहे, असा सवाल उपस्थित नागरिकांनी नोडल अधिकारी हनुमंतप्पा मनव•र यांना विचारला.

नगरपंचायतीसमोर विकासकामांच्या आराखड्याचा फलक लावा

नगरपंचायतमार्फत कोणकोणती विकासकामे राबविण्यात आली आहेत, याबद्दल इथल्या नागरिकांना कोणतीच माहिती नाही. त्यामुळे नगरपंचायतीसमोर विकास कामाच्या आराखड्यांचा फलक लावावा, अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली. जादा करआकारणीसह संगणक उताऱ्यासाठी अवाढव्य रक्कम घेण्यात येत आहे. यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणीही उपस्थित नागरिकांनी केली आहे. तसेच सरकारच्या आदेशानुसार संगणक उताऱ्यासाठी किती रक्कम आकारण्यात येते. करवाढ कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. याबद्दल सभा घेऊन नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला याबाबत माहिती द्यावी, अशी मागणीही यावेळी केली. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच जाब विचारला व या नगरपंचायतीमध्ये सुरू असलेला सावळा गोंधळ बंद करावा, अशी मागणीही केली.

संगणक उताऱ्यासाठी जादा पैशाची मागणी

पिरनवाडी नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारची दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारच्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. मात्र करवाढ अधिक करण्यात आली असल्यामुळे व्यावसायिकांना याचा फटका अधिक प्रमाणात बसू लागला असल्याची माहिती काही व्यावसायिकांनी दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना घर बांधण्यासाठी संगणक उतारा हवा आहे. मात्र नगरपंचायतीमध्ये संगणक उतारा मिळणे कठीण बनले आहे. यासाठी आवश्यकतेपेक्षा जादा पैसे घेण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांनी घर बांधायचे कसे, असा प्रŽही यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी राकेश तलवार, शिवाजी शहापूरकर, सचिन गोरले, पिराजी मुचंडीकर, चंद्रकांत पाटील, आप्पाजी मुचंडीकर, कुशाप्पा नाईक, प्रमोद पाटील, पुंडलिक बस्तवाडकर, राकेश पाटील, देवेंद्र पाटील, रमेश माळवी, गजानन पिंगट आदींसह पिरनवाडी, हुंचेनहट्टी, खादरवाडी भागातील प्रमुख पंचमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठवड्यात तोडगा काढा अन्यथा...

नगरपंचायतीचा दर्जा मिळूनही इथली निवडणूक का झाली, असा सवालही करण्यात आला. नोडल अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार सरकारला सूचना करावी, अशी मागणी यावेळी केली. आमच्या मागणीचा प्रशासनाने विचार करावा आणि योग्य ते तोडगा काढावा. अन्यथा येत्या सात दिवसानंतर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन नोडल अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharatnews#tarunbharatsindhudurg#tarunbharatSocialMedia
Next Article