महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संगमरवराचे सिंहृ सोन्याचे पंख असलेली देवता

06:48 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रीसमध्ये मिळाली हजारो वर्षे जुनी इमारत

Advertisement

ग्रीसमध्ये पुरातत्व विभागाच्या उत्खननात एका प्राचीन भव्य इमारतीचे अवशेष मिळाले आहेत. या इमारतीत संगमरवराच्या सिंहांच्या मूर्ती आणि सोन्याच्या कलाकृती आहेत. उत्खननात मिळालेल्या सामग्रीत सोन्याचे पंख असलेली मूर्ती देखील असून तिला प्राचीन युनानी देवता मानले जात आहे. हे ठिकाण ग्रीसच्या एजियो शहरापासून 5 मैल अंतरावर असून तेथेच शोधकार्य झाले आहे. एजियो पेलोपोन्सीन बेटावरील एक शहर आहे. ग्रीसच्या संस्कृती मंत्रालयाने हा शोध अचिया क्षेत्राच्या प्राचीन शहराची निगडित असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

हे उत्खनन आणि संशोधन मुख्यत्वे एका इमारतीवर केंद्रीत करत करण्यात येत असून याला ग्रीक अक्षर गामाने दर्शविले जाते. ही इमारत ख्रिस्तपूर्व 300 वर्षांपूर्वीची आहे. पुरातत्व तज्ञांनी विविध दगडांचे ब्लॉक आणि स्तंभांच्या पुराव्यांचा शोध घेतला. त्यांनी संरचनेच्या दक्षिण हिस्स्याच्या 55 फूट लांब काठाचाही खुलासा केला आहे.

इमारतीत मिळालेल्या सामग्रीतून ही संरचना प्राचीन वसाहत ‘हीरोन’चे प्रतिनिधित्व करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हीरोन एका नायकाला समर्पित मंदिर होते. हीरोन सर्वसाधारणपणे पूजा आणि श्रद्धेचे स्थान असायचे. तेथे ग्रीक पौराणिक कथा किंवा स्थानिक वदंतेच्या नायकाला सन्मानित केले जात होते. हे सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी निर्माण केले जायचे जे नायकाशी संबंधित असायचे. या मंदिरांमध्ये पंथाच्या मूर्ती ठेवल्या जात होत्या आणि विधींसाठी या ठिकाणाचा वापर केला जात होता.

या स्मारकाच्या आत संशोधकांनी अनेक थडगी आणि एक ताबूत मिळाले आहे. यात विशेषकरून सिंहाचे शीर असलेल्या सोन्याची कर्णफुले मिळाली आहेत. पंखयुक्त इरोसची आकृती असलेली कर्णफुले देखील मिळाल्या आहेत. याच्या उजव्या हातात एक राजदंड आणि डाव्या हातात एक फुलांचा हार आहे.  इरोसला रोमन पौराणिक कथांमध्ये कामदेवाच्या स्वरुपात ओळखले जाते. ती प्रेम आणि इच्छेची प्राचीन ग्रीक देवता होती. याला अनेकदा धनुष्य आणि बाण असलेल्या पंखयुक्त युवांच्या स्वरुपात चित्रित केले जात होते.

इमारतीच्या समोरच्या हिस्स्याला झाकणाऱ्या ढिगाऱ्याखाली संशोधकाहंनी अनेक सिंहांच्या मूर्तींच्या अवशेषांचा शोध लावला आहे. या सर्व पेंटेलिक संगमरवराने निर्मित होत्या. पेंटेलिक संगमरवर एक प्रकारचे पांढरे संगमरवर असून याचे उत्खनन ग्रीसच्या एटिकामध्ये माउंट पेंटेलिकॉन येथून केले जाते. हे स्वत:च्या सोनेरी-पांढऱ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. हे विशेषकरून प्राचीन ग्रीक वास्तुकल आणि मूर्तिकलेत याच्या वापरासाठी ओळखले जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article